गडचिरोली: मृत्यूनंतरही रुग्णवाहिका न मिळाल्याने क्षयरोगग्रस्त युवकाचा शव दुचाकीवर खाटेला बांधून गावी नेला | Batmi Express

Be
0

Gadchiroli News,Gadchiroli,Bhamragad,Gadchiroli Batmya,



गडचिरोली
: भामरागड तालुक्याच्या दुर्गम भागातील कृष्णार येथील एका २३ वर्षीय युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर आज प्रशचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. कारण १७ जुलै रोजी गणेशला गंभीर अवस्थेत हेमलकसा येथे उपचार करण्यासाठी भरती करण्यात आले होते. परंतु २० जुलैला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने शव दुचाकीवर खाटेला बांधून गावी नेण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

देशात क्षयरोग निर्मुलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष विभाग कार्यरत असतो. निदान झाल्यानंतर रुग्णाला नियमित औषधोपचार देणे. वेळोवळी आरोग्यसेवकांच्या माध्यमातून त्याची देखरेख करणे. यासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात येताे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आरोग्य विभागाच्या दुर्लक्षीपणामुळे कृष्णार येथील २३ वर्षीय क्षयरोगग्रस्त आदिवासी तरुण गणेश लामी याला जीव गमवावा लागला. इतकेच नव्हे तर मृत्यूनंतर रुग्णवाहिका न मिळाल्याने कुटुंबिय व नातेवाईकांना क्षयरोगग्रस्त युवकाचा मृतदेह चक्क दुचाकी वर खाटेला बांधून गावी न्यावा लागला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->