गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 21 गेट 0.5M उघडण्यात आले असून 81620 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळी 2:35PM वाजता धरणातून विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आलं आहे.गोसीखुर्द चे 21 दरवाजे उघडले असल्याची माहिती आहे.आणि या 21 दरवाज्यातून 81620 क्युसेक पर्यंत पाणी विसर्ग वैनगंगा नदी पात्रात केलं जाईल. विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे.
गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्यामुळे तसेच ऊर्ध्व भागातील वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेज मधून पाण्याचा विसर्ग सुरु असताना गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील तासात धरणाचा विसर्ग 81620 क्युसेक पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.