Gadchiroli Yellow Alert: गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता | Batmi Express

Be
0

Gadchiroli Yellow Alert,Gadchiroli Rain,Gadchiroli Rain 2023,Chandrapur Rain,ChandrapurChandrapur Yellow Alert,Gadchiroli,Nagpur,Gondia,Bhandara,Wardha,

गडचिरोली :- प्रादेशिक हवामान विज्ञान खाते केंद्र नागपूर यांनी वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार आणखी पुढील दोन दिवस गडचिरोली जिल्ह्यासह नागपूर,चंद्रपूर,गोंदिया,भंडारा व वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना व बहुदा सर्वत्र तर काही ठिकाणी हलक्या-मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची संभावना वर्तविण्यात आली आहे.

सहा ही जिल्ह्यात उद्या २८ जून ते २९ जून २०२३ रोजी दोन दिवस पावसाचे यलो अलर्ट घोषित करण्यात आले असून ३० जून ते १ जुलै रोजी रोजी पाऊस पडणार नसल्याची संभावना प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविली आहे. 

काय करावे आणि काय करू नये याबाबत सुचना

वादळ मेघगर्जना आणि आकाशात विजा चमकत असतांना काय करावे आणि काय करू नये, याबाबत प्रशासनाने नागरिकांसाठी सुचना निर्गमित केल्या आहेत. विजेच्या गडगडाटासह पावसाची पुर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जावून गुडघ्यात डोके घालून बसावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. घरातील विद्युत उपकरणे त्वरीत बंद करा, ताराचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तुंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

आकाशात विजा चमकत असल्यास फोनचा वापर करू नका. शॉवरखाली आंघोळ करू नये. घरातील बेसीनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा उपयोग करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असतांना लोखंडी धातुच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातुच्या उंच मनो-याजवळ उभे राहू नका. घरात असाल तर उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडतांना पाहू नका, हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->