तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

विद्युत कर्मचाऱ्याचा करंट लागून मृत्यू | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Batmya,Gadchiroli Today,

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Batmya,Gadchiroli Today,

गडचिरोली, १९ जून :
तालुक्यातील येवली परिसरातील दर्शनी माल येथे विद्युत खांबावर चढून काम करत असतांना करंट लागल्याने विद्युत कर्मचाऱ्याचा खांबावरच मृत्यू झाल्याची घटना सोमवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. वैभव जेंगठे (२२) असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, विद्युत कर्मचारी जेंगठे हा सकाळच्या सुमारास दर्शनी माल येथे वीज दुरुस्ती करण्याकरिता विद्युत खांबावर चढला. दुरुस्तीचे काम करतांना अचानक जेंगठे ला जोरदार विजेचा धक्का बसल्याने त्याचा खांबावरच मृत्यू झाला. विद्युत खांबावर चढला तेव्हा वीज नव्हती अचानक वीज आल्याने सदर घटना घडल्याचे बोलल्या जात आहे. मात्र थोड्याश्या चुकीने विद्युत कर्मचारी वैभव जेंगठे ला आपला जीव गमवावा लागला. मृतक जेंगठे हा ब्रम्हपुरी तालुक्यातील मरारमेंढा येथील रहिवासी असल्याचे कळते. तर तो येवली परिसरात तत्परतेने काम करणारा कर्मचारी म्हणून परिचीत होता. त्याच्या अश्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून जेंगठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.