वणी:- शहरातील सेवा नगर परिसरात सेक्स रॅकेट सुरू आहे.अशी माहिती वणी चे ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांना मिळताच त्यांनी या रॅकेटचा पर्दाफाश करून आरोपिंना अटक करून त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी सेक्स रॅकेट चालविणारी एक महिला व एका ग्राहकाला ताब्यात घेऊन त्यांचेवर कारवाई करण्यात आली. हि कारवाई सोमवारी १९ जून रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कार्यवाही मुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
१९ जून रोजी सपोनि.माया चाटसे यांनी ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांच्या माहिती नुसार घटनास्थळी धाव घेऊन एका घरी छापा टाकून दिपाली नामक वय ३४ वर्ष वणी हि महिला घरी होती. पोलिसांनी घरातल्या आत बेडरूममध्ये पाहिले असता २९ वर्षीय तरूण व एक ३६ वर्षीय महिला अर्धनग्न अवस्थेत आढळून आले.सदर महिलेची विचार पुस केली असता तीने ती नागपूर येथील असल्याचे सांगितले.पोलिसांनी घराची झडती घेतली असता चार वेगवेगळ्या कंपन्याचे महागडे मोबाईल,ज्याची किंमत अंदाजे ३८ हजार रुपये,नगदी ३ हजार रुपये, असा एकूण ४१,३५० रुपयांचा माल जप्त केला.
आरोपी दिपाली व वणी येथील २९ वर्षीय तरुणानावर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.