तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Maharashtra HSC Result 2023: कोकण अव्वल! राज्याचा 12वीचा निकाल 91.35 टक्के; मुलींची बाजी, नागपूर 90.35%, पुणे: 93.34%, मुंबई: 88.13 | Batmi Express

HSC 2023 Exam News,SSC 2023 Exam Result,HSC 2023 Exam Result,HSC Result,Maharashtra HSC Result 2023,Education,SSC Exam Result,SSC 2023,SSC 2023 Result

HSC 2023 Exam News,SSC 2023 Exam Result,HSC 2023 Exam Result,HSC Result,Maharashtra HSC Result 2023,Education,SSC Exam Result,SSC 2023,SSC 2023 Result,HSC 2023,

Maharashtra HSC Result 2023
: :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 2 वाजल्यापासून निकाल उपलब्ध होतील. राज्याचा एकूण निकाल 91.35 टक्के लागला आहे. कोकण बोर्डाचा सर्वाधिक निकाल 96.01 टक्के लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी (88.13 टक्के) लागला आहे. 


दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी सर्वोत्तम बाजी मारली आहे. यावर्षी 93. 73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण  89.14 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा पाच टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे.राज्याचा एकूण निकाल 91.35 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला असून मुंबईचा निकाला 88.13 टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला आहे. 

विद्यार्थ्यांची आकडेवारी:

  • एकूण परीक्षेला बसले विद्यार्थी :14,16,371 
  • एकूण उत्तीर्ण विद्यार्थी: 12,92,468
  • निकालाची टक्केवारी : 91.35 टक्के
प्रवाहानुसार उत्तीर्णतेची टक्केवारी:

विज्ञान : ९६.०९ टक्के
कला : ८४.०५ टक्के
वाणिज्य: 90.42 टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम: 89.25 टक्के
एकूण: 91.25 टक्के


विभागानुसार निकाल:

  • राज्याचा एकूण निकाल : 91.35 टक्के
  • पुणे: 93.34 टक्के
  • नागपुर: 90.35 टक्के
  • औरंगाबाद: 91.85 टक्के
  • मुंबई: 88.13 टक्के
  • कोल्हापुर: 93.28 टक्के
  • अमरावती: 92.75 टक्के
  • नासिक: 91.66 टक्के
  • लातूर: 90.37 टक्के
  • कोंकण: 96.01 टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. दुपारी  दोन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना 'Batmi Express' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. बातमी एक्सप्रेसची अधिकृत वेबसाईट https://www.batmiexpress.com/p/hsc-result-2023-live.html वर  बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. 

महाराष्ट्र बारावीचा निकाल 2023 कसा तपासायचा:

  • बातमी एक्सप्रेसची अधिकृत वेबसाइटवर ( https://www.batmiexpress.com/p/hsc-result-2023-live.html) जा आणि Menu / होमपेजवरील इयत्ता 12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा रोल नंबर आणि/किंवा नोंदणी क्रमांक टाका.
  • बॉक्समध्ये तुमच्या आईचे नाव लिहा (उदा. आईचं नाव Usha)
  • तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  • भविष्यातील वापरासाठी निकाल पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.