ब्रम्हपुरी, २५ मे: ब्रम्हपुरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माद्यामिक शिक्षण मंडळाने अंतर्गत गुणांच्या आधारे मंगळवारला 12वी परीक्षेचा निकाल २५ मे ला (HSC Exam 2023) ऑनलाईन निकाल आज दुपारी दोन वाजता जाहीर झाला. ने. हि.महाविद्यालया उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असून, निकाल ९८.४६ टक्के निकाल इतका आहे .
महाविद्यालयाचा निकाल पुढीलप्रमाणे : विज्ञान शाखेत रुतुजा कामडी हिने ८९.५ टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. रोहिणी हजारे हिने कला शाखेत सर्वोच्च ८८ टक्के गुण प्राप्त केले. कला शाखेतून ती प्रथम क्रमांकावर आहे. वाणिज्य विभागातून हितेश बोरकर याने प्रथम क्रमांक पटकाविण्याचा मान मिळविला आहे. त्याला ८९.१७ टक्के इतके गुण मिळाले आहेत. सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव अशोक भय्या, प्राचार्य डॉ. धनंजय गहाने, पर्यवेक्षक आनंद भोयर यांनी अभिनंदन केले आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत ब्रम्हपुरी तालुक्याचा निकाल (98.46 ) टक्के लागला आहे.
विद्यार्थ्यांची आकडेवारी:
- एकूण परीक्षेला बसले विद्यार्थी : 778
- एकूण उत्तीर्ण विद्यार्थी: 766
- एकूण फेल विद्यार्थी: 12
- निकालाची टक्केवारी : 98.46 टक्के
- राज्याचा एकूण निकाल : 91.35 टक्के
- पुणे: 93.34 टक्के
- नागपुर: 90.35 टक्के
- औरंगाबाद: 91.85 टक्के
- मुंबई: 88.13 टक्के
- कोल्हापुर: 93.28 टक्के
- अमरावती: 92.75 टक्के
- नासिक: 91.66 टक्के
- लातूर: 90.37 टक्के
- कोंकण: 96.01 टक्के