Breaking! गडचिरोलीच्या जंगलात पोलीस - नक्षलवाद्यांत चकमक, एक नक्षली ठार | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Naxal,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Naxal,Gadchiroli Batmya,

गडचिरोली:- 
गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कियरकोटी अबुझमाड जंगल परिसरात आज (शनिवार) सकाळी १० वाजता पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एका नक्षलवाद्यास ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश आले आहे. या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

गडचिरोली पोलीस दलाचे सी-60 जवान भामरागड तालुक्यातील जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना लपून बसलेल्या नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. यात पोलीस जवानांनी एका नक्षलवाद्यास ठार केले आहे. त्याचा मृतदेह जवानांच्या हाती लागला आहे. घटनास्थळावरून दोन बंदूक आणि इतर नक्षल साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. घटनास्थळावर सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

मदतीसाठी गडचिरोली पोलीस मुख्यालयातून हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले असून घटनास्थळ घनदाट जंगलात असल्याने मदतीसाठी विलंब होत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे.



Recent: एट्टापल्ली तालुक्यातील जांबिया गट्टा पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या मुसपर्शी जंगल परिसरात आज सकाळी १० वाजता च्या दरम्यान C 60 पोलीस जवान नक्षल विरोधी शोध मोहीम राबवत असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीसाच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पोलीसही जशास तसे उत्तर दिले.
या झालेला चमकित एका नक्षलवाद्याला ठार करण्यात पोलिसांना यश आले. सोबतच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य व शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे . चकमक परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने त्याठिकाणी संपर्क साधण्यास अडचण निर्माण होत असून, अजूनही चकमक सुरू सुरू असून सर्चिंग ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे. 10AM IST

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.