तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

ब्रम्हपुरी: चिखलगाव येथील अवैध रेती वाहतुक जोमात; प्रशासन सुस्त..! रेती तस्कर मस्त..! | Batmi Express

Sand Smuggling,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Bramhapuri News,

Sand Smuggling,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Bramhapuri News,

ब्रम्हपुरी 
: तालुक्यातील चिखलगाव येथे आज सकाळच्या सुमारास वैनगंगा नदी पात्रात अवैध रेती उपसा होत आहे. यावर प्रशासन आळा घालणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेती तस्करांच्या मुजोऱ्या वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे प्रशासन सुस्त तर रेती तस्कर मस्त; अशी परिस्थिती पहावयास मिळत असल्याने तालुक्यातील अनेक रेती घाट अवैध तस्करांच्या विळख्यात सापडले असल्याचे हल्ली सर्वत्र चित्र दिसून येत आहे.

चिखलगाव परिसरात गेल्या अनेक महिना भरापासून हे खोदकाम करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅक्‍टरचा वापर करून गावातील मुख्य रस्त्याने वडसा, ब्रम्हपुरी, सुरबोडी, जुनी वडसा ही अवैध रेती वाहतूक होत असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकारात काही स्थानिक व्यक्तींचा सहभाग घेतल्याने वाद नको म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अर्थात वाळूतस्करीचा हा व्यवसाय काही स्थानिक यंत्रणांना हाताशी धरून केला जात असल्याने तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न नागरिकांना आज निर्माण झालं आहे. 

वैनगंगा नदी तालुक्यातील एकमेव मोठी नदी आहे. यंदाच्या पावसाळ्यात या नदीला महापूर आलं होत. जुन्या रपत्याची दुरुस्ती आजही झाली नाही. जानेवारीपासून नदीचा प्रवाह थांबल्याने अनेक ठिकाणी पात्र उघडे आहे. ही ठिकाणे आता वाळू माफियांचे लक्ष्य आहेत.

अवैध रेती तस्करीवर प्रशासनाकडून जोपर्यंत कठोर पावले उचलली जाणार नाही.तोपर्यंत सर्वत्र असेच चित्र दिसून येणार असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.