तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

जहाल नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिस दलाने केली अटक | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Naxal,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Naxal,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,

गडचिरोली (Gadchiroli) :
 माहे फेब्रुवारी ते माहे मे दरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारचे सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने (Gadchiroli Police Force) एका जहाल नक्षलवाद्यास १८ एप्रिल २०२३ रोजी अटक केले.

१७ एप्रिल २०२३ रोजी मिळालेल्या गोपनिय खबरीच्या आधारे पोलीस मदत केंद्र गट्टा (जां.) हद्दीतील मौजा हाचबोडी जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान, पोमकें गट्टा (जां.) येथील पोस्ट पार्टीचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलीस बलच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून जहाल नक्षली साधु ऊर्फ काऱ्या ऊर्फ संजय नरोटे (३१) रा. झारेवाडा तह. एटापल्ली, जि. गडचिरोली यास अटक केली. तो सन २०१५ पासुन गट्टा दलममध्ये भरती होऊन सदस्य या पदावर कार्यरत होता. २८ मार्च २०२३ रोजी तो नक्षल दलम सोडुन घरूनच नक्षलविरोधी कारवाया करीत होता. त्याच्यावर पोलीस पार्टीयर ॲम्ब्युश लावणे, जाळपोळ करणे, पोलीस व निष्पाप नागरीकांना जिवे ठार मारणे, दरोडा इत्यादी गंभीर स्वरुपाचे २३ गुन्हे दाखल आहेत. त्यात १२ चकमक, २ पोलीस जवानांसहीत एकुण ८ खुन, २ जाळपोळ व १ दरोडा यांचा समावेश आहे. त्याचा धुळेपल्ली २०२०, कोदुर-२०२०, टेकामेडा-२०२१, गोरगुट्टा – २०२१, गुंडरवाही ॲम्ब्युश- २०२० या चकमकींमध्ये सहभाग होता. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने एकुण २ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे माहे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण ६७ नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक प्रशासन  कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांच्या  मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असून नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.