'
30 seconds remaining
Skip Ad >

साथ संपली नाही बाबा....कात संपली नाही....तू गेला आणि सर्व संपले जात संपली नाही... | Batmi Express

0
Korchi,Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,

  • सुप्रसिद्ध साहित्यिक, कविवर्य, सामाजिक विचारवंत ज्ञानेश वाकुडकर यांचे प्रतिपादन

कोरची: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण केले त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. घरातील विहिरीत पाणी गढूळ करण्याचा प्रयत्न कुणी केला तर आपली विहीर बुजवून टाकायची गरज नसते त्याच्यावर उपाय करणे गरजेचे असते त्याचप्रमाणे सामाजिक चळवळीत महापुरुषांचे विचार अंगी असायला पाहिजे. साथ संपली नाही बाबा कात संपली नाही तू गेला अन सर्व संपले जात संपली नाही असे प्रतिपादन कोरचीतील आयोजित समाज प्रबोधन मेळाव्यात सुप्रसिद्ध साहित्यिक, कविवर्य सामाजिक विचारवंत ज्ञानेश वाकुडकर यांनी केले आहे.

         कोरची येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त बौद्ध समाजाकडून आयोजित धम्मभूमी येथे शनिवारी समाज प्रबोधन मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या समाज प्रबोधन मेळाव्याचे उद्घाटन कोरची नगरपंचायत नगराध्यक्ष सौ हर्षलाताई भैसारे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी समारंभ अध्यक्ष म्हणून प्राचार्य देवराव गजभिये हे होते. प्रमुख प्रबोधनकार वक्ते म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक कवीवर्य सामाजिक विचारवंत ज्ञानेश वाकुडकर, प्रसिद्ध वक्ते जिंदा भगत, पुज्यनिय भदंत डॉ. राजरत्न वर्धा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर प्राध्यापक अजय बोरकर, मुरलीधर भर्रे सर, स्वागताध्यक्ष तुळशीराम अंबादे, सामाजिक कार्यकर्ते अशोक गावतुरे, माजी नगराध्यक्ष नसरुद्दीन भामानी, नगरसेवक घनश्याम अग्रवाल, पत्रकार नंदकिशोर वैरागडे ज्येष्ठ नागरिक विठ्ठल भैसारे, रामदास साखरे, मंसाराम अंबादे, प्राचार्य उमाकांत ढोक, सामाजिक कार्यकर्ते इजाम साय काटेंगे, मुख्याध्यापक शालिकराम कराडे, राकॉ अध्यक्ष सियाराम हलामी, नगरसेवक शैलेंद्र बिसेन, दिलीप मडावी, युवा नेते कमलेश भानारकर, भीमपूर शाखा अध्यक्ष महेश लाडे, मसेली शाखाध्यक्ष मानिक राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

        यादरम्यान प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना  पुज्यनिय भदंत डॉ राजरत्न वर्धा म्हणाले की मानवाची प्रगती करायची असेल तर गौतम बुद्धांनी सांगितलेले पंचशील, अष्टांगिक मार्ग, दानपरामीता ह्या मार्गाचे आपण जेव्हा पर्यंत अनुकरण करत नाही तोपर्यंत आपण डॉ बाबासाहेबांचे खरे अनुयायी होऊ शकत नाही. शांतीने नांदणारा तो बुद्धाचा धम्म आहे विश्वाला तारणारा तो बुद्धाचा धम्म आहे असतील जगामध्ये कित्येक जाती धर्म समतेने बांधणारा तो बुद्धाचा धम्म आहे तो बुद्धाचा धम्म आहे असे मार्गदर्शन प्रबोधन मेळाव्यात उपस्थित नागरिकांना केले. 

          समाज प्रबोधन मेळाव्याच्या कार्यक्रमापूर्वी बौद्ध समाजातील नवयुवक मंडळांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भाषण स्पर्धा ठेवली होती या स्पर्धेत माळी समाज व बौद्ध समाजातील लहान लहान 06 बालकांनी भाग घेतला होता यामध्ये प्रथम गौरव सहारे, द्वितीय मानसी वाढई, तृतीय अरहंत अंबादे, आणि प्रोत्साहन पर प्रथमा भैसारे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व संविधान, धर्मांतर का ?, देशाचे दुश्मन, मी सावित्री अशी पुस्तके देण्यात आले.

         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर साखरे तर संचालन कुमारी सोनाली सोरते तर आभार चंद्रशेखर अंबादे यांनी केला. सायंकाळी सर्व बौद्द बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती त्यानंतर रात्रो आर्केस्ट्राचे आयोजन केले होते या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कोरची शहरातील समस्त बौद्ध बांधवांनी अथक परिश्रम घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×