- बौद्ध समाज तालुका कोरचीचा पहिल्यांदाच पुढाकार
कोरची: तालुक्यातील कोटगुल येथे पहिल्यांदाच बौद्ध समाज कोरची तालुक्याच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा व समाज प्रबोधन मेळावा 19 एप्रिल रोजी पार पडला. या विवाह सोहळ्यामध्ये सहा जोडप्यांनी लग्न गाठ बांधली. जोडप्यांना मंगळसूत्र व संसारोपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या.
विवाह सोहळ्या दरम्यान समाज प्रबोधन करण्यासाठी प्रमुख वक्ता म्हणून ज्येष्ठ साहित्यिक तथा संपादक मूकनायक नागपूर जावेद पाशा कुरेशी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य, मताधिकार विषयी लोकांना माहिती, संविधानाचे महत्त्व, सिम्बॉल ऑफ नॉलेज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणाविषयी कार्य, सामूहिक विवाहाचे फायदे, वर्तमान काळात एकजुटीने राहणे अशा इतर बाबतीत महामानवांचे विचार सर्वांनी अंगीकारावे असे उपस्थित जनसमुदायांना उद्बोधन केले.
या विवाह सोहळ्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष प्रतापसिंग गजभिये, प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभा छत्तीसगड प्रदेशाध्यक्ष एम डी वाल्दे, महासचिव नारद टेंभुरकर, कोरची पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यशवंत टेंभुर्णे, पंचायत समिती माजी सभापती श्रावणकुमार मातलाम, कोटगुल सरपंचा सौ मंजुषा कुमरे, नांगपूर उपसरपंच परमेश्वर लोहंबरे, शिक्षक विनोद कोरेटी, मोठाझेलिया ग्रामपंचायत सचिव भूपेंद्र उईके, कोटगुल को-ऑपरेटिव बँक जांभुळकर साहेब, मीराताई दूधकवर, कोरची तालुका बौद्ध समाज अध्यक्ष नकुल सहारे, संघटक आनंदराव राहुल, कोषाध्यक्ष रामदास साखरे, कोटगूल शाखाध्यक्ष बिरसिंग उमरे, कोचीनारा शाखाध्यक्ष सुदाराम सहारे, भिमपुर शाखाध्यक्ष महेश लाडे, कोरची शाखाध्यक्ष तुलसी अंबादे, बेलगाव शाखाध्यक्ष नकुल सहारे, मसेली शाखाध्यक्ष माणिक राऊत, उपाध्यक्ष अंतराम टेंभुर्णे, रामदास अंबादे, प्राचार्य देवराव गजभिये, बेळगाव पोलीस उपनिरीक्षक अशोक कराडे, अनिल जनबंधू, किशोर साखरे, रमाई महिला मंडळ अध्यक्ष सौ ज्योतीताई भैसारे, सचिव सौ छायाताई साखरे, मेश्राम मॅडम, चेतन कराडे, पत्रकार राहुल अंबादे, रमेश सहारे सर, वशीम शेख, चंदू वाल्दे आदी उपस्थित होते.
सदर सामूहिक विवाह सोहळा लोकवर्गणीतून व श्रमदानातून पहिल्यांदाच करण्यात आले असून आज वाढत्या महागाईत पालकांना आपल्या मुलांचे लग्न करणे कठीण झाले त्यालाच अनुसरून कोरची तालुका बौद्ध समाजातील पदाधिकारी यांनी विवाह सोहळा करण्याचे ठरविले. या विवाह सोहळ्यामध्ये नांगपूर, खिरुटोला, कोटगुल, वाको या गावातील सहा उपासक तर कोंडरुज, अरजकुंड, खिरुटोला, देवलगाव, भगदेना, बालोद गावातील सहा उपासिका यांचे नातेवाईक व गावकरी लग्नगाठ बांधण्यासाठी उपस्थित झाले होते. या परिणय सोहळ्याची विधी भंते यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शालिकराम कराडे, संचालन जीवन भैसारे आभार चंद्रशेखर अंबादे यांनी केले. उपस्थित जनसमुदायांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. सदर विवाह सोहळा यशस्वीतेसाठी तालुक्यातील बौद्ध बांधवांनी अथक परिश्रम घेतला.