ब्रम्हपुरी: लाडज येथील कच्या रस्त्यावर चिखलच-चिखल; प्रवास धोकादायक मात्र ग्रामपंचायतचे दुर्लक्ष | Be Media Mobile Repoter

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Chandrapur Live,Bramhapuri Live,Bramhapuri News,

ब्रम्हपुरी: लाडज येथील कच्या रस्त्यावर उन्हाळ्यातील पावसात चिखलच-चिखल
 

ब्रम्हपुरी - लाडज :- ग्रामपंचायत लाडज येथे लाडज ते चिखलगाव कच्चा रस्त्यावर  उन्हाळ्यातील पावसामुळे चिखलच-चिखल असून याला ग्रामपंचायत जबाबदार असून तात्काळ डाबंरीकरणाच काम करण्यात यावे जेणे कडून ये - जा करण्यास सोय होईल. यात खुदाई करुन असलेल्या रस्त्यावर नुसता माती, लहान दगडे आणि मोठे खड्डे पडुन आहे.  या रस्त्यावर वरुन ये-जा करायच म्हटल तर तारेवरची कसरत करावी लागत आहे व उन्हाळ्यातील पाऊसाने या रस्त्यामुळे लाडज गावातील लोक त्रस्त झाले आहे.

लाडज गावाला मागील काही वर्षांपूर्वी डांबरीकरण आलं होत. रस्त्यावर गिट्टी सुद्धा टाकण्यात आली होती, मग काम पूर्ण का झालं नाही? चिखलमय रस्त्यावरून ये - जा करण्यास नागरिकांना अतिशय त्रास  सहन करावा लागत आहे. 

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Chandrapur Live,Bramhapuri Live,Bramhapuri News,

चिखलातून दुचाकी वाहनाने प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात टाकून प्रवास करणे होय. लोकांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यातील पावसाच्या पाण्यात इतक्या मोठ्याने रस्त्यावर चिखल होऊन दुचाकी वाहन स्लिप होण्याची शक्यता तर समोर येणाऱ्या पाऊसात या रस्त्याने प्रवास कसा करावा याची चिंता आता जनतेला होऊ लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.