चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात सुरक्षा रक्षक ठार | Batmi Express

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News,Tiger Attack,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Tiger Attack,
Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur   News,Tiger Attack,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Tiger Attack,

चंद्रपूर: चंद्रपूर – मुल मार्गावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (Tadoba Tiger Project) बफर झोन (Buffer Zone) अंतर्गत येणाऱ्या लोहराच्या जंगलात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात (Tiger Attack) सुरक्षा रक्षक झालं ठार. 

पुरुषोत्तम बोपचे (वय ४०) असं वाघाच्या हल्ल्यात ठार  झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता उघडकीस आली. इंदिरा नगर येथील रहिवासी असलेला पुरुषोत्तम स्थानिक एम ई एल पोलाद कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. 

सकाळी पुरुषोत्तम वन फुले वेचण्यासाठी लोहारा जंगलात गेला होता. मात्र दुपार झाली तरी सुद्धा घरी परतला नसल्याने त्याच्या पत्नीने घरा शेजारी असलेल्या पतीच्या मित्रासोबत त्याचा शोध घेतला. यावेळी जंगलात येऊन बघितले असता त्याचा मृतदेह मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.