कोरची: भरधाव दुचाकीने दोन युवक चीचगडवरून-कोरचीला येत असताना मसेलीजवळ राष्ट्रीय महामार्गावरिल रस्त्याच्या वळनावर दुचाकीसमोर अचानक जंगली डुक्कर पुढे आल्याने दुचाकीचे अपघात रात्रौ 8 वाजता दरम्यान झाले. यामधील चालक युवकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने उपचारादरम्यान रात्रौ 9:30 वाजता रुग्णालयात मृत्यू झाले आहे तर दुसरा युवक गंभीर जखमी असून या दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते.
जितेंद्र बुधराम फुलकवर (21) रा. कोरची असे मृतक युवकाचे नाव असून गंभीर जखमी प्रणय शामराव काटेंगे (23) रा. कोरची याच्यावर कोरची ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू असून पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. याचे वडील शिक्षक आहेत.
दुचाकी MH 35 AN 4036 क्रमांक वाहनाने बुधवारी मृतक जितेंद्र फुलकवर व प्रणय काटेंगे हे दोघेही चीचगड- शिरपूरला मित्राला कोरचीला लग्नसोहळ्यासाठी आणायला गेले होते मात्र मित्राला काम असल्याने तो आला नाही मग हे दोघे कोरचीला परत येत असताना सदर अपघात झाले. अपघात झाल्यानंतर जखमी प्रणय ने वडील शामराव काटेंगे व मित्र आशिष हिडामी, विकास हिडामी याना फोनवरून माहिती दिली यानंतर घटनास्थळी येऊन त्यांनी मोटारसायकलने या दोघांना कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मृतक जितेंद्र हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता वडील बुधराम फुलकवर हे पांढरीगोटा येथील सरपंच आहेत तर आई कोरची ला असून जितेंद्र आईकडे लहानपणापासून राहत होता. त्याच्या अपघाती मृत्यूनंतर परिवारात व कोरचीतील आदिवासीं बांधवात शोककळा पसरला आहे. दुपारी 3:30 वाजता दरम्यान त्याच्यावर खुणारा येथील शेतावर अंतीमसंस्कार करण्यात आले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.