'
30 seconds remaining
Skip Ad >

HSC English Paper Mistake : इंग्रजी विषयाच्या त्या चुकीच्या प्रश्नांना 'हे' 6 गुण 'या' विद्यार्थ्यांना मिळणार | Batmi Express

0

 Pune Today,Pune Live,HSC 2023 Exam,Pune News,HSC 2023,HSC 2023 Exam News,Education News,HSC Exam,Education,Pune,SSC 2023 Exam News,

पुणे : राज्यात मंगळवारपासून (दि. 21) बारावी बोर्डाची (HSC Exam) परीक्षा सुरु झाली आहे. कोविडनंतर यंदा प्रथमच १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होत आहे. राज्यातील 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून राज्यात जवळपास साडेचौदा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी (English Paper Mistake) विषयात गंभीर चूक (Mistake) समोर आली आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्न पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 03 च्या À3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी थेट उत्तर छापण्यात आल्याने बोर्डाच्या कामाची गंभीर चूक समोर आली आहे. तर इतर दोन प्रश्नांमध्ये तपासणाऱ्याला सूचना दिल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचे नेमके काय उत्तर लिहावे ? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे आता बोर्डाने विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार करत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

इंग्रजी च्या प्रश्‍नपत्रिकेतील कवितेचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहा गुण देण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आलेला आहे. अशी माहीती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली आहे.

इंग्रजी विषयाच्या प्रश्न पत्रिकेमध्ये चुक प्रश्न क्रमांक 03 च्या 

  • A3 - मध्ये पेपर तपासण्याराला सूचना.  (2M) 
  • A4 - प्रश्नाऐवजी थेट उत्तर (2M) 
  • A5 - प्रश्नाऐवजी थेट उत्तर  (2M)
प्रिटींग मिस्टेकमुळे पेपरमध्ये मॉडेल अन्सरमधील उत्तरेच छापण्यात आली होती, प्रत्येकी दोन गुण प्रमाणे एकूण सहा गुणांचे हे तीन प्रश्‍न होते. हे प्रश्‍नच विद्यार्थ्यांना समजले नाहीत. 
उत्तरपत्रिकेमध्ये Poetry / Section-2 असा उल्लेख केला असल्यास किंवा विद्यार्थ्यांनी Poetry Section-2 मधील अन्य कोणतेही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असेल तर किंवा त्रुटी असलेला प्रश्न क्रमांक (A-3, A-4, 4-5) उत्तरपत्रिकेमध्ये लिहिला असल्यास विद्यार्थ्यांना हे गुण मिळणार असल्याची माहीती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×