चंद्रपुर दि 3/3/2023: सिंदवाही-नागपुर मार्गावर मेंढा माल नजीक झालेल्या अपघातात शरद तिरमारे या युवकाचा जागिच मृत्यु झाला.
सविस्तर वृत असे की ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे कार्यरत असलेले शरद दादाजी तीरमारे वय 32 वर्ष रा. मेंढा माल हे आपली ड्यूटी करुन रात्रो 8 वजताच्या सुमारास आपल्या दुचाकी वहनाने आपल्या गावी जात असतांना सिंदेवाही नागपुर मार्गावर विरुद्ध दिशेने गिट्टी भरून भरधाव वेगाने जात असलेल्या हायवा ट्रक क्र. mh 40 ak 6928 ने होंडा शाइन या दुचकी वाहनाला धड़क दिल्याने शरद तिरमारे या युवकाचा जागिच मृत्यु झाला, घटनेची माहिती सिंदेवाही पो.स्टे ला मिळताच सिंदेवाही पो.स्टे चे ठानेदार तुषार चव्हाण व त्यांचे चमु घटनास्थळी येवून पंचनामा केला मृतक शरदचा शव ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठविन्यात आला.
शरद तिरमारे हा घरचा कर्ता होता.सात वर्षा अगोदर त्याचा भाऊ त्याच मार्गावर अपघात होऊन ठार झाला होता.शरदचा अपघाती मृत्यु झाल्याने घराच्या लोकावर दुःखचा डोंगर पढ़ला आहे त्याच्या मागे आई, पत्नी, सात वर्षाचि मुलगी, पाच वर्षाचा मुलगा असा आप्तपरिवार आहे।
हाइवा ट्रक दुचाकी ला धड़क देवून फरार झाला मात्र सिंदेवाही पालिसांनी अवघ्या अर्धा तासात त्या फरार ट्रक चा शोध लावला ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ठानेदार तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली P S I सागर महल्ले,नेरलावार करीत आले.