![]() |
News Represented |
ब्रम्हपुरी : 10 वी आणि 12वी ची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडून अभियान राबविले जात आहे. त्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली. मात्र या कॉपी मुक्त अभियानाचा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील विद्यालयात फज्जा उडवला जात आहे.
शिक्षण विभाग द्वारे कॉपी मुक्त अभियान खरचं राबविण्यात आलं का ? तर मग शिक्षकच प्रश्नाची उत्तरे सांगत असेल तर हि कॉपी नाही का ? - हुशार विद्यार्थी
विद्यालयामध्ये आज सुरू असलेल्या 12 वीच्या गणित पेपर दरम्यान कॉप्यांचा बाहेरून पुरवठा केला जात होत. इतकेच नाही तर इंग्लिश पेपर दरम्यान कॉप्यां विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या.
कॉप्यां पुरवण्यासाठी विद्यार्थ्यांना कडून चक्क काही शिक्षकानीच पैसे घेतले आणि विदयार्थ्यांना कॉपी देऊ लागले. येवढ्या मोठ्या प्रमाणात हा सर्व प्रकार खुलेआम सुरू असताना परीक्षा केंद्रावरील शिक्षक नेमके काय करत आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तरी पण या केंद्रावर बिनधास्त कॉपी केली जात आहे. या प्रकारामुळे हुशार विद्यार्थ्यांना मात्र गोंधळाचा सामना करावा लागला.
विद्यार्थ्यांनी असंही म्हटलं की शिक्षक प्रश्नाची उत्तरे सांगत असताना आम्हाला पेपर सोडवताना अनेकदा त्रास झालं. त्यामुळे अशा शिक्षकांवर कडक कारवाही करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी बातमी एक्सप्रेस द्वारा केली आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) 21 फेब्रुवारी ते 21 मार्च तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) 2 ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हा दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून कॉपी बहाद्दरांवर कडक कारवाई करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात 12 वी चे एकूण विद्यार्थी 27900 आणि परीक्षा केंद्र 83 तर 10 वी चे एकूण विद्यार्थी 28683 आणि परीक्षा केंद्राची संख्या 125 आहे. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात पोलिस अधिनियम 37 (1)(3) चा वापर करणे, पोलिस बंदोबस्त ठेवून परीक्षा केंद्रावर 50 मीटरच्या आत अनधीकृत व्यक्तिंना प्रवेशबंदी, सर्वसाधारण, संवेदनशील व अतिसंवेदनशील परिक्षा केंद्राचे वर्गीकरण करणे, 1973 च्या कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश, 50 मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवणे. तसेच परिक्षा इमारतीच्या परिसरात मोबाईल फोन, लॅपटॉप इत्यादी वापरावर प्रतिबंध आदी सुचना देण्यात आल्या आहेत.
नोट : बातमी लेखनात महाविद्यालयाचे नाव लिहण्यात आलं असंत परंतु विद्यार्थ्यांनी लिहण्यास मनाई केली आहे. वेळ पडल्यास अशा महाविद्यालयाचे नाव जाहीर करण्यात येईल - बातमी एक्सप्रेस
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.