राज्याच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी मोठी बातमी आज समोर आली आहे. बारावीच्या गणित पेपर फुटीप्रकरणी पोलिसांच्या तपासात आणखी खळबळजनक माहिती समोर आली आहे. बारावीचा गणित पेपर कॉपी करण्यासाठी 99 जणांचा व्हॉट्सअपचा एक ग्रुप बनवण्यात आला होता. या ग्रुपमध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल 99 जण जोडले गेले होते. एवढंच नाही तर बारावीत पास करुन देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 ते 12 हजार रुपये घेतले जात असल्याची माहितीही मिळतेय.
विधीमंडळातही विरोधी पक्षनेते अजित पवारांनी परीक्षेचं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला होता... या पेपरफुटीमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे.. याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत हे शोधणं राज्य सरकारसमोर मोठं आव्हान आहे.. या संपूर्ण प्रकरणावर आता राज्य सरकार काय कारवाई करतेय हे पाहणं महत्त्वाचं आहे.
एक महत्त्वाची बाब म्हणजे गणिताचं पेपर पुन्हा होणार का ? कारण गणिताचं पेपर फुटीप्रकरणी रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.