'
30 seconds remaining
Skip Ad >

वडसा: १५ वर्षीय तरुण युवकाने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा; कारण अस्पष्ट | Batmi Express

0

Wadsa,crime news,Gadchiroli,Crime,suicide,Wadsa News,Gadchiroli Suicide,Wadsa Suicide,Gadchiroli Batmya,Desaiganj,

वडसा : नगर परिषद हद्दीत येणाऱ्या जुनी वडसा मध्ये राहत असलेल्या प्रथमेश ईश्वर पत्रे (वय १५ वर्षे) या तरुण युवकाने ४ मार्च रोजी दुपारी ११.०० वाजताच्या सुमारास घरातीलच बेडरुम मध्ये  गळफास घेऊन आत्महत्या (Suicide by hanging) केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रथमेश पत्रे १० व्या वर्गात शिक्षण घेत होता.

घरी कुणीही नव्हते आई- वडील बाहेर कामासाठी गेले होते व लहान बहीण ८ व्या वर्गात शिक्षण घेत असून ती शाळेतून घरी पोहचल्यानंतर प्रथमेश पत्रे हा घरातीलच बेडरुममधे गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आल्याने बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली.

लगेच गावातील माजी नगरसेवक सचिन खरकाटे यांनी देसाईगंज पोलीस विभागाला सदर घटनेची संपूर्ण माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक इनामदार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात सदर युवकाचे शव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. गळफास घेण्याचे कारण अद्यापही कळलेले नसून पुढील तपास देसाईगंज पोलीस विभाग करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×