'
30 seconds remaining
Skip Ad >

कुरखेडा : वडेगांव येथील सरपंच, उपरपंच आणि एक सदस्य अखेर पायउतार | Batmi Express

0

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Kurkheda News,kurkheda,

कुरखेडा
(प्रतिनिधी): ६ फेब्रुवारी; वडेगांव गट ग्रामपंचायत येथील सरपंच उपसरपंच व एका सदस्याचे सदस्यत्व ग्रामपंचायत कामाचा मोबदला उचल करण्यात त्यांचा कूटूंबाचे हितसंबंध असल्याचा आरोपावरून जिल्हाधिकारी गडचिरोली यानी ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा विविध कलमान्वये त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. त्यामूळे येथे खळबळ माजली आहे.

वडेगांव गट ग्रामपंचायत कार्यालयात ११ सदस्यीय कार्यकारी मंडळ असून येथील सरपंच पदावर जमनाबाई जमकातन तर उपसरपंच पदावर भाग्यवान जनबंधू मागील दोन वर्षापासून कार्यरत आहेत. दरम्यान येथील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय कोरेटी यानी जिल्हाधिकारी गडचिरोली यांचा कडे येथील सरपंच जमनाबाई जमकातन यांचे पती पत्नी सरपंच पदावर कार्यरत असताना ग्रामपंचायत चा सार्वजनिक विहीरीचा गाळ उपसण्याचा कामावर मजूर म्हणून राहत त्याचा मोबदला घेतला. तसेच एप्रील २०२१ ची मासीक सभा कोरम अभावी तहकूब झाल्याने ती त्याच महिण्यात घेणे बंधनकारक असताना ती घेण्यास कसूर केली. असा आरोप त्यांचावर तक्रारीत करण्यात आला होता. तर उपसरपंच भाग्यवान जनबंधू यांचा वडीलांचा नावावर असलेला ट्रक्टर जून २०२१ मध्ये ग्रामपंचायत चा कचरा कुंडीतील कचरा उचल करण्याचा कामावर लावत त्याचा मोबदला १३००० रू घेण्यात आला. तसेच सार्वजनिक हातपंपावर इलेक्ट्रिक मोटर बसवत त्याचा वापर करीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. तर ग्रामपंचायत सदस्य रजनीताई बंसोड यांचा पतीचा नावावर असलेला ट्रक्टर जून २०२१ मध्ये ग्रामपंचायत चा कचरा कुंडीतील मलमा सफाईचा कामावर लावत त्याचा मोबदला म्हणून १४००० रू ची उचल केल्याची तक्रार जिल्हाधिकारी गडचिरोली यांचा कडे संजय कोरेटी यानी केली होती. जिल्हाधिकारी गडचिरोली यांचा दालनात दोन्ही गटाची बाजू एकूण घेत सूनावनी करताना जिल्हाधिकारी यानी तक्रारदाराची तक्रार ग्राह्य धरत विद्यमान सरपंच जमकातन उपसरपंच जनबंधू व सदस्य बंसोड यांचा विरोधात ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा मुंबई अधिनियम क्र ३ चे कलम १४ (१) (ग) अन्वये कार्यवाही करीत त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. एकाच वेळी येथील सरपंच व उपसरपंच पद रिक्त झाल्याने येथे नविन व्यवस्था होईपर्यंत प्रशासक राज निर्माण होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×