'
30 seconds remaining
Skip Ad >

HSC Paper Leak Case: पेपरफुटीप्रकरणात आणखी दोघांना अटक; आरोपींची संख्या सातवर | Batmi Express

0

Mumbai Live,HSC Math Paper,HSC Mathematics Paper Leak,HSC 2023 Exam,Mumbai News,HSC Math Paper 2023,Mumbai,HSC 2023,HSC 2023 Exam News,Education News,HSC Exam,Education,Pune,Mumbai Today,

बुलढाणा
: बारावी पेपरफुटी प्रकरणी (HSC Paper Leak Case) पोलिसांनी आणखी दोघांना अटक करण्यात आलीय. दोघेही बुलढाण्यातील (Buldhana) लोणार तालुक्यातील (Lonar Taluka) खाजगी शाळेवरील शिक्षक असल्याची माहिती समजतेय. आत्तापर्यंत पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची संख्या सातवर पोहोचलीय. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. शकील शे. मुनाफ (रा. लोणार) आणि अंकुश पृथ्वीराज चव्हाण (रा. सावरगाव-तेली, ता. लोणार) अशी त्या दोघा शिक्षकांची नावं आहेत.

बारावी बोर्डाचा गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पानं सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली होती. याची बातमी सर्व माध्यमांवरून प्रसिध्द झाली. दरम्यान, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचं राज्यात कुठंही आढळलं नव्हतं. यामुळं बारावीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचं राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केलंय. मात्र मुंबईत विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणिताच्या पेपरची काही पानं आढळल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण मिळाल्याचं पाहायला मिळतंय.

बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाचा संबंध मुंबईतील विद्यार्थ्यांशीही असल्याचं समोर आलंय. मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणित पेपरचा काही भाग आढळलाय. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. क्राईम ब्रांचकडं हा तपास वर्ग करण्यात आलाय. बुलढाण्यातील कथित पेपरफुटी प्रकरणी पेपर फुटला नसल्याचं बोर्डानं केला होता.

बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजामध्ये (Buldhana Sindkhed News)  बारावीचा गणिताचा पेपर परीक्षा (HSC Maths Paper Leak)  सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच फुटल्याची चर्चा आहे. गणिताचा पेपर सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. पेपरफुटीच्या मुद्द्यावर विधानसभेतही चर्चा झाली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला होता. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×