SSC-HSC Board Exam 2023: आता परीक्षा केंद्रावर उशिराने जाणा-या विद्यार्थ्यांना 'नो एंट्री'...! दहावी,बारावी परीक्षेसाठी निर्णय | Batmi Express

HSC 2023 Exam News,HSC Exam,Education,SSC 2023 Exam,SSC 2023,HSC 2023 Exam,HSC 2023,SSC 2023 Exam News,

HSC 2023 Exam News,HSC Exam,Education,SSC 2023 Exam,SSC 2023,HSC 2023 Exam,HSC 2023,SSC 2023 Exam News,

SSC-HSC Board Exam 2023: दहावी आणि बारावी परीक्षेबाबत शिक्षण मंडळाकडून महत्वाची सूचना जारी करण्यात आली असून, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, परीक्षेला  येणाऱ्या विद्यार्थ्यांना  दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणार आहे. जर विद्यार्थी काही मिनीटानंतर आलं तर अशा विध्यार्थ्यांना पेपरला परवानगी देण्यात येणार नाही.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार, सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी  3 वाजता अशी पेपरची वेळ आहे.  

तसेच आतापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत 10  मिनिटे उशीर झाला असला तरी, विद्यार्थ्यांना पेपरला परवानगी देण्यात येत होती, परंतु राज्य मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश परीक्षा केंद्रांना दिले आहे. 

तसेच परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.