तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

कोरची: क्रुझरने दुचाकीला उडविले, भीषण अपघातात 2 जण जागीच ठार | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Bus Accident,Gadchiroli Accident News,Korchi Accident,Korchi,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Bus Accident,Gadchiroli Accident News,Korchi Accident,Korchi,Gadchiroli Batmya,

कोरची
:- मुख्यालयापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर मोहगाव नजीक गुरुवारी दुपारी सुमारे दोनच्या दरम्यान कोरची येथून कुरखेडा कडे प्रवासी घेऊन जाणारी महिंद्रा कंपनीची गाडी क्रमांक MH 04 BQ 1924 भरधाव वेगाने जात होती व समोरून येणारी दुचाकी क्रमांक CG 08 F 3217 ला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकी स्वार रस्त्याच्या एका कडेला व दुचाकी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकली गेली यामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून मृतकाचे नाव छबिलाल सोरी रा. मोहगाव आहे. प्रवासी घेऊन जाणाऱ्या गाडीमध्ये दोन चिमुकल्या समवेत दहा प्रवाशी होते. ज्यामध्ये अंजना मडावी पड्यालजोब (26), उसन लाडे कराडी (52), नामदेव तुलावी लवारी (28) पूजा तुलावी/लवारी (25), युग तुलावी लवारी (5 महिने), जयश्री फुलकुवर पांडूटोला (24), सोनल फुलकुवर पांडूटोला (34), रश्मी मडावी बेळगाव (35), राशी मडावी बेळगाव (9) असे अपघातग्रस्तांचे नाव असून एका महिलेचा या अपघातामध्ये मृत्यू झाला असून मृतक महिलेची ओळख पटू शकली नव्हती.


अपघातग्रस्तांसाठी रुग्णवाहिकेला दीपक नरडंगे यांनी संपर्क केला व घटनास्थळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, रामसुराम काटेंगे, वसीम शेख, सुरज हेमके, आशिष अग्रवाल, राष्ट्रपाल नखाते, पद्माकर मानकर, चतुर सिंद्राम आदींनी अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतुन रुग्णालयात दाखल केले. रुग्णांची तपासणी डॉ. अभय थुल व डॉ. राहुल राऊत यांनी केली. सदर घटनेची चौकशी पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक फुलकुवर व चमू करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अपघात झाल्यानंतरचालक हा गाडी सोडून पसार झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Korchi :- Mahindra Company cruiser number MH 04 BQ 1924 carrying passengers from Korchi to Kurkheda near Mohgaon on Thursday around two kilometers from the headquarters was speeding and hit the two wheeler number CG 08 F 3217 coming in front. The impact was so strong that the two-wheeler was thrown to one side of the road and the two-wheeler to the other side of the road. There is Mohgaon. There were ten passengers, including two small children, in the passenger car. In which Anjana Madavi Padyaljob (26), Usan Lade Karadi (52), Namdev Tulavi Lawari (28), Pooja Tulavi/Lawari (25), Yug Tulavi Lawari (5 months), Jayashree Phulkuvar Pandutola (24), Sonal Phulkuvar Pandutola (34) , Rashmi Madavi Belgaum (35), Rashi Madavi Belgaum (9) and one woman died in this accident and the identity of the deceased woman could not be ascertained.

Deepak Nardange contacted the ambulance for the accident victims and Congress taluka president Manoj Aggarwal, Ramsuram Katenge, Wasim Sheikh, Suraj Hemke, Ashish Aggarwal, Rashtrapal Nakhate, Padmakar Mankar, Chatur Sindram etc. admitted the accident victims to the hospital. Examination of patients by Dr. Abhay Thul and Dr. By Rahul Raut. Assistant Police Inspector Phulkuvar and Chamu are investigating the incident under the guidance of Police Inspector Amol Phadtare. According to the information received, the driver left the vehicle and fled after the accident.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.