तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

ब्रम्हपुरी : मास्तर मुलांना बोलवतो १० वाजता अन...मास्तर येतो तर 2 वाजता, शिकवितो काय तर भजन... | Batmi Express

Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,Bramhapuri Marathi News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,

Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,Bramhapuri Marathi News,Chandrapur,Chandrapur   News,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,

ब्रम्हपुरी
- गुरुवारला झालेल्या प्रजासत्ताक दिनी सांगली जिल्ह्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या कार्तिकच्या भाषणाची अख्खा महाराष्ट्रभर चर्चा आणि कौतुक झाले. जिल्हा परिषद शाळांमध्येच असे विद्यार्थी घडतात असा एक सुर पण निघाला. आज त्या घटनेला अवघे पाच दिवस पूर्ण झाले असतांना राज्याच्या पूर्व टोकावरील वाघांसाठी प्रसिद्ध चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील कोसंबी खडसमारा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षक वक्तशीर नाहीत, अभ्यासक्रम शिकवत नाही त्यामुळे होत असलेल्या शैक्षणिक नुकसानीला कंटाळून गावातच फेरी काढून अभिनव आंदोलन केले. आम्हाला आता असलेले शिक्षक बदलून नवीन जादा शिक्षक देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या बेधडक आक्रोशाने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.

विद्यार्थी, शिक्षक यांच्या जीवनात वक्तशीरपणाला सर्वोच्च स्थान आहे. शालेय जीवनातून वेळेचे महत्व अंगी भिणले तर विद्यार्थ्यांचे अख्खे जीवन यशस्वी होते. त्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी अध्यापन करावे आणि विद्यार्थ्यांनी अध्ययन करावे हेच शिक्षक आणि विद्यार्थी यांचे महत्वाचे कर्तव्य असते. लोकांसांगे ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण अशी एक म्हण मराठीत आहे. या म्हणीला साजेसे वर्तन कोसंबी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांचे होते. अखेर त्याच शाळेच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या शाळेतील अनियमित येण्याला, अशोभनीय शब्दांना कंटाळून आज गावात आगळेवेगळे आंदोलन केले. सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रांगेत गावातील रस्त्यांनी फेरी काढून आपली मागणी अख्ख्या गावाला ओरडून सांगितली.


Bramhapuri- Little Karthik's speech at a Zilla Parishad school in Sangli district on Thursday's Republic Day was discussed and appreciated all over Maharashtra. There is also a rumor that such students happen only in Zilla Parishad schools. Today, only five days have passed since that incident, the students of Zilla Parishad School in Kosambi Khadsamara in Bramhapuri Taluka of Chandrapur District, famous for tigers in the eastern part of the state, fed up with the loss of education due to teachers not being punctual and not teaching the curriculum, started a new protest in the village. The students have demanded that we replace the existing teachers with new additional teachers. The fearless outcry of the students has created excitement in the education sector.

Punctuality has the highest place in the lives of students and teachers. If the importance of time is learned from the school life, the entire life of the students becomes successful. It is the important duty of teachers and students that the teachers should teach the students going to school and the students should study. There is a proverb in Marathi that says Brahmagyan to people, but we are dry stone. The teachers working in the Zilla Parishad School in Kosambi behaved in accordance with this saying. Finally, the first to eighth grade students of the same school, fed up with the teacher's irregular coming to the school, indecent words, started a separate protest in the village today. All the students marched in a disciplined line through the streets of the village and shouted their demands to the entire village.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.