'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर: वाघ आला रे... वाघाच्या हल्ल्यात इसम जागीच ठार | Batmi Express

0
Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur   News,Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,

मोहर्ली:- मोहर्ली :- प्रकल्प अंतर्गत मोहर्ली (बफर) वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 874 मध्ये वाघाच्या हल्लात एक वृद्ध इसम ठार झाले असल्याची घटना आज दि. 08 फरवरी 2023 रोजी सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

प्राप्त माहीतीनुसार शेत कुंपण करण्यास चपाट्या आणण्यासाठी मोहर्ली (बफर) जंगलात वृद्ध इसम नीलकंठ नन्नावरे व अडकू जेंघठे दोघे चपाट्या आणण्यासाठी गेले असता अचानक वाघाने येऊन एका वृद्ध इसमावर हल्ला करून ठार केले.

सदर घटनेत मृतकाचे नाव नीलकंठ नारायण नन्नावरे वय (59) वर्ष राहणार मोहर्ली असे आहे. अचानक वाघाच्या हल्ला होताच जवळ असलेला अडकू जेंघठे यांनी आरडाओरडा केले. पण वाघाने नीलकंठला काही सोडले नाही व त्याला आत जंगलात 50 मीटर अंतरावर खिचत नेले. हे बघून अडकू जेंगठे लगेच गावा कडे परत आले व ग्रामस्थांना सूचना दिली व ग्रामस्थांना मोहर्ली वनपरिक्षेत्र कार्यालय यांच्याशी सम्पर्क केले. माहीती मिळताच वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, क्षेत्र सहाय्यक मोहर्ली संजय जुमडे, क्षेत्र सहाय्यक मोहर्ली (कोअर) व्ही. बी. सोयाम, क्षेत्र सहाय्यक आगरझरी एस. एल. बापाने, वनरक्षक जनबंदु, वनमजूर व ग्रामस्थ घटना स्थळी दाखल झाले.

मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या समक्ष मौका पंचनामा करण्यात आला व घटना स्थळी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून पुढील कारवाही वनविभाग करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×