तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

SSC-HSC 2023 Exam: पेपर फुटी आणि कॉपी करण्यावर बसणार आळा; प्रश्नपत्रिका १० मिनिटे अगोदर वितरित करण्याचं निर्णय रद्द | Batmi Express

Education,Education News,Aurangabad,Aurangabad Live,Aurangabad News,Aurangabad Today,HSC 2023 Exam,HSC 2023,SSC 2023 Exam,SSC Exam,

Education,Education News,Aurangabad,Aurangabad Live,Aurangabad News,Aurangabad Today,HSC 2023 Exam,HSC 2023,SSC 2023 Exam,SSC Exam,

औरंगाबाद :-
 समाज माध्यमावर होणाऱ्या पेपर फुटीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्यासाठी आता परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात येत आहे.अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओेक यांनी दिलेल्या पत्रात दिली आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची लेखी परीक्षा २ मार्च पासून घेण्यात येणार आहे. या परीक्षांचे आयोजन कॉपीमुक्त वातारवणात होण्यासाठी राज्य मंडळाच्या वतीने शुक्रवारी बैठक घेण्यात आली.यावेळी ही माहिती ओक यांनी दिली.दहावी-बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक आणि समाज घटक या परीक्षांकडे लक्ष देवून असतात.विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाच सहा वर्षापासूनदेण्यात येत होती. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच समाज माध्यमातून व्हायरल झाल्याचे प्रकार, अफवा अशा घटनाही परीक्षेच्या काळात निदर्शनास आलेल्या आहेत. त्यामुळे पेपरफुटीच्या अशा अफवांमुळे परीक्षार्थींचे नुकसान होते, त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. पेपरफुटीच्या घटनांना आळा बसावा, परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात येत आहे असे ओक यांनी म्हटले आहे.कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथकांशिवाय बैठे पथके, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधिकक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या समन्वयातूनही भरारी पथक नियुक्त करण्यात येणार आहेत

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.