सिंदेवाही:- सिंदेवाही ते मूल मार्गावरील सरडपार येथील पुलाजवळ दुचाकीला एका अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक तरुण व तरुणी जागीच ठार झाले तर दुचाकीवरील तिसरा तरुण गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. हा अपघात गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला. घटनेनंतर लगेच जखमी व मृतकांना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. घरी खोटे सांगून चाॅकलेट डे साजरा करण्याकरिता हे तिघेही जण सिंदेवाहीला गेले होते. तेथून परताना हा अपघात झाल्याची गावात चर्चा आहे.
सिंदेवाही: 'चाॅकलेट डे' साजरा करून घरी परतताना अपघात; तरुण-तरुणी ठार | Batmi Express
सिंदेवाही:- सिंदेवाही ते मूल मार्गावरील सरडपार येथील पुलाजवळ दुचाकीला एका अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक तरुण व तरुणी जागीच ठार झाले तर दुचाकीवरील तिसरा तरुण गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. हा अपघात गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला. घटनेनंतर लगेच जखमी व मृतकांना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. घरी खोटे सांगून चाॅकलेट डे साजरा करण्याकरिता हे तिघेही जण सिंदेवाहीला गेले होते. तेथून परताना हा अपघात झाल्याची गावात चर्चा आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.