HSC Hindi Exam Paper: पहिल्या दिवशी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकीनंतर चक्क आता हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ( HSC Hindi Exam Paper ) सुद्धा चुका झाल्याचं समोर आलं आहे. हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्नांमध्ये उपप्रश्न क्रमांक चुकीचे देण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेमका उपप्रश्न क्रमांक काय टाकायचा या संदर्भात संभ्रम निर्माण झाला. (HSC Hindi Exam paper)
हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते. मात्र, या शब्दांचे क्रमांक 1, 2,1,2 असे देण्यात आले. हे क्रमांक 1,2,3,4 असे असायला हवे होते. तर चार समानार्थी शब्द लिहिण्यासाठी दिलेल्या चारही शब्दांना 1,1,11 असे क्रमांक देण्यात आले हे क्रमांक 12.3.4 असे असायला हवे होते.
मात्र या बद्दल लवकरच बोर्ड निर्णय घेणार आहे. तर अशा प्रकारे हिंदी विषयाच्या प्रश्न पत्रिकेमध्ये काहीसा गोंधळ झाला. याचा विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार का ? विद्यार्थ्यांना मार्क बोनस मिळणार का ?