यवतमाळ मध्ये बारावीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच वॉट्सॲप ग्रुपवर पेपर व्हायरल (HSC Exam Paper Leak on Whatsapp ) झाल्याची माहिती समोर आली. मुकुटबन इथल्या आदर्श हायस्कूल आणि पुनकाबाई आश्रमशाळा हे दोन केंद्र समाविष्ट आहेत. या दोन्ही केंद्रावर परीक्षा सुरू असतानाच आश्रम शाळेतील खोली नंबर आठमधून प्रश्नपत्रिकेची चार पानं व्हॉट्सऍप ग्रुपवर व्हायरल झाली.
पेपरफुटीच्या या प्रकारानंतर गटशिक्षणाधिकारी यांनी मुकूटबन पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून केंद्रप्रमुखासह दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये केंद्रप्रमुख अनिल दुर्लावार, पर्यवेक्षक प्रेमेंदर येलमावार आणि फोटो काढणा-या अज्ञात व्यक्तीविरुद्ध सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आल आहे