पुणे : राज्यात मंगळवारपासून (दि. 21) बारावी बोर्डाची (HSC Exam) परीक्षा सुरु झाली आहे. कोविडनंतर यंदा प्रथमच १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होत आहे. राज्यातील 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून राज्यात जवळपास साडेचौदा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी (English Paper) विषयात गंभीर चूक (Mistake) समोर आली आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्न पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 03 च्या A3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी थेट उत्तर छापण्यात आल्याने बोर्डाच्या कामाची गंभीर चूक समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) आणि सचिव अनुराधा ओक (Anuradha Oak) यांनी संयुक्त सभेच्या अहवालानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना त्रुटी दूर करून योग्य न्याय दिला जाईल, असे म्हटले आहे.
- A3 - मध्ये पेपर तपासण्याराला सूचना. (2M)
- A4 - प्रश्नाऐवजी थेट उत्तर (2M)
- A5 - प्रश्नाऐवजी थेट उत्तर (2M)
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.