'
30 seconds remaining
Skip Ad >

मोठी बातमी! अज्ञात वाहनाच्या धडकेत पोस्टमन आणि पोस्टमास्तर जागीच ठार... | Batmi Express

0

Gadchiroli News,Aheri,Gadchiroli Accident,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

अहेरी ता. 28: अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले. ही घटना आज दुपारी अहेरी तालुक्यातील वेलगूर टोला गावानजीक घडली. रवी किष्टे (21), रा. परभणी व धोंडिबा पवार (22) रा. नांदेड अशी मृतांची नावे आहेत. रवी किष्टे हे पोस्टमन, तर धोंडिबा पवार हे पोस्टमास्तर होते. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा पोस्ट ऑफिस अंतर्गत कम्मासूर येथे रवी किष्टे हे पोस्टमन, तर धोंडिबा पवार हे पोस्टमास्तर म्हणून चार महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. 29 ते 30 जानेवारी या कालावधीत गडचिरोली येथे प्रशिक्षण असल्याने रवी किष्टे, धोंडिबा पवार हे अन्य सहकाऱ्यांसह आज दुपारी सहा मोटारसायकलींनी गडचिरोली येथे जात होते.

पाच मोटारसायकली पुढे निघून गेल्या. परंतु रवी किष्टे आणि धोंडिबा पवार हे बरेच मागे राहिले. ते का आले नाहीत म्हणून अन्य सहकाऱ्यांनी मागे जाऊन बघितले असता दोघेही अपघातात ठार झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघेही ठार झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

Aheri h. 28: Two persons were killed on the spot after an unidentified vehicle hit a motorcycle. The incident took place this afternoon near Velgur Tola village in Aheri taluka. Ravi Kishte (21), Res. Parbhani and Dhondiba Pawar (22) Res. The names of the deceased are Nanded. Ravi Kishte was the postman and Dhondiba Pawar was the postmaster. Ravi Kishte was a postman and Dhondiba Pawar joined as postmaster in Kammasur under Jimalgatta post office in Aheri taluka four months ago. Ravi Kishte, Dhondiba Pawar along with other colleagues were going to Gadchiroli on six motorcycles this afternoon as there was training at Gadchiroli from 29th to 30th January.
Five motorcycles drove off. But Ravi Kishte and Dhondiba Pawar remained far behind. When other colleagues went back to see why they did not come, it was noticed that both had died in an accident. Both are believed to have been killed in a collision with an unknown vehicle. After getting information about the incident, Aheri police reached the spot and conducted a panchnama.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×