तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

नागपुर: यूट्यूबवर व्हिडीओ पाहून १२ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या | BatmiExpress™

Nagpur LIve News,Nagpur Suicide,Nagpur LIve,nagpur news,suicide news,suicide,Nagpur,Nagpur Today,

Nagpur LIve News,Nagpur Suicide,Nagpur LIve,nagpur news,suicide news,suicide,Nagpur,Nagpur Today,

नागपूर :
 नागपूरमधील सोमवारी क्वार्टर परिसरात अग्रण्य सचिन बारापात्रे हा १२ वर्षीय मुलगा आपल्या आई-वडिलांसह राहत होता. २५ जानेवारीला १२ वर्षीय मुलाचे आई-वडिल कामानिमित्त बाहेर गेले होते. तेव्हा अग्रण्य गच्चीवर गळफास घेतलेल्या स्थितीत शेजाऱ्यांना आढळला. त्याला नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी केलेल्या तपासात अग्रण्याला मोबाईलचे व्यसन असल्याचे समोर आले आहे. गळ्यात गळफास लटकवून तो कसा काढायचा याचे व्हिडीओ तो सतत बघत होता. अग्रण्य तसा प्रयत्न करायला गेला आणि त्यातून त्याचा मृत्यू झाला, असे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी नागपूरमधील सक्करदरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सक्करदरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांनी सांगितल्यानुसार, अग्रण्यवर मनोरुग्ण डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. त्याला यूट्यूबवर व्हिडीओ पाहण्याचा सवय होती. त्याने डोळे बांधून हात कसा सोडवायचा, हा व्हिडीओ पाहिलेला आढळला आहे. आईच्या साडी आणि ओढणीने तो घरात झोपाळा बांधायचा आणि त्याबरोबर खेळायचा. ही आत्महत्या नसून अपघात आहे, अशी माहिती धनंजय पाटील यांनी दिली.


Nagpur: A 12-year-old boy, Sachin Barapatre, was living with his parents in the Monday Quarter area of Nagpur. On January 25, the parents of the 12-year-old boy had gone out for work. Neighbors found him hanging on the front terrace. He was admitted to Government Medical College in Nagpur for treatment. But, doctors declared him dead.

In the investigation conducted by the police, it has been revealed that Agranya is addicted to mobile phones. He was constantly watching videos on how to remove it by hanging a noose around his neck. The investigation revealed that Agranya went to try and died from it. Sakkardara police in Nagpur have registered a sudden death in this case.

According to Sakkardara Police Station Inspector Dhananjay Patil, Agranya was being treated by a psychiatrist. He used to watch videos on YouTube. It has been found that he has watched this video how to release his hand while blindfolded. He used to make a sleeper in the house with his mother's saree and todhani and play with it. Dhananjay Patil informed that it was not a suicide but an accident.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.