तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपुरात अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यास बंदी; दुचाकी चालकांवर 10 हजार रुपयांचा दंड | Batmi Express

Chandrapur,Chandrapur Live,Traffic News,Traffic Rules News,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News,Pravin Patil,Chandrapur News IN Mara

Chandrapur,Chandrapur Live,Traffic News,Traffic Rules News,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur  News,Pravin Patil,Chandrapur News IN Marathi,

चंद्रपूर
अल्पवयीन असल्यानं गाडी चालवण्याचं लायसन्स मिळत नसलं तरी अशा मुलांचं गाडी चालवण्याचं प्रमाण वाढत आहे. या मुलांना टू-व्हीलर कशी चालवायची, याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नसतं. बॅलन्स सांभाळता आला म्हणजे गाडी आली, असं समजलं जातं. वाहतुकीच्या नियमांची माहिती नसते. पण तरीही पालकांकडून त्यांना गाडी दिली जाते. मात्र अशा पद्धतीने मुलांना गाडी चालवण्यास देणं पालकांसाठी आता खूपच महाग पडणार आहे. ( Juvenile driving )

पालकांकडून लहान मुलांना वाहने चालविण्यास देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघातांची भितीही व्यक्त करण्यात येत असते. नियमानुसार चालक १८ वर्षांचा झाल्याशिवाय वाहन चालवू शकत नाही. तसेच त्या व्यक्तीस परवानाही मिळत नसतो. असे असतानाही अनेक पालक मुलगा १० वी उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयात मुलाला जाण्यासाठी वाहन घेऊन देत असतात. (Know the Juvenile driving rule under motor vehicle act)

मात्र आता यासर्व प्रकाराला चाप बसणार असून वाहतूक विभागाने अल्पवयीन वाहन चालकासाठी नवे कायदे लागू केले आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी चंद्रपूर वाहतूक नियंत्रक शाखा सज्ज झाली आहे, पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी वाहने देऊ नये अन्यथा कायद्याच्या चौकटीत सापडल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा चंद्रपूर वाहतूक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील ( Pravin Patil )  यांनी दिला आहे. ( traffic rules

चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयात नव्या कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, त्यांनतर अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई मोहीम राबविण्यात येणार अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी न्युज ३४ सोबत बोलताना दिली. (  New traffic laws )

वाहतूक विभागाचे नवे काय काय? 

कोणी अल्पवयीन वाहन चालवताना पकडला गेला तर त्याच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाऊ शकते. जर एखादा अल्पवयीन मुलगा वाहन चालवताना पकडला गेला तर त्याच्या पालकांना १० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. यासोबतच त्याला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो. म्हणूनच, जर तुमचे मूल अल्पवयीन असेल आणि तुम्ही त्याला/तिला मोटार चालवायला दिल्यास, लगेच काळजी घ्या. पालकांनी आपल्या अपत्याला अल्पवयीन असताना वाहन चालवायला देऊ नये.  


Chandrapur - Even though they do not get a license to drive because they are minors, the number of such children driving is increasing. These children have no formal training on how to drive a two-wheeler. It is understood that if the balance can be maintained, then the car has arrived. Traffic rules are not known. But still they are given a car by their parents. But it will be very expensive for the parents to allow their children to drive in this way.

There has been an increase in the number of parents allowing their children to drive. Due to this, the fear of accidents is also expressed. According to the rules, a driver cannot drive unless he is 18 years old. Also that person does not get a license. Despite this, many parents take a vehicle for their child to go to college after passing 10th.

But now all these types will be affected and the traffic department has implemented new laws for minor vehicle drivers, Chandrapur traffic controller branch is ready to implement that law, parents should not give two-wheelers in the hands of their minors, otherwise strict action will be taken if found in the frame of the law Chandrapur traffic police inspector. It has been given by Pravin Patil.

Police Inspector Praveen Patil told News 34 that guidance will be given in schools and colleges of Chandrapur district regarding the new law, after which action will be taken against minor vehicle drivers.

What is new in the Department of Transport?

If a minor is caught driving, his parents can be prosecuted. If a minor is caught driving, his parents can be fined Rs 10,000. Along with this, he can be jailed for up to 3 years. So, if your child is a minor and you let him/her ride a motorcycle, be careful right away. Parents should not allow their child to drive under age.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.