दुचाकी-कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर | Batmi Express

Be
0

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Accident,Accident,Korpana,Chandrapur Accident News,

कोरपना:
- सकाळी 10 वाजता बाखर्डी जवळ भीषण अपघात होऊन एका विद्यार्थिनीचा जागेवरच मृत्यू झाला तर ज्या तरुणीचे आज साक्षगांध होते. ती तरुणी व दुचाकी चालक तरुण गंभीर रित्या जखमी असून त्यांना चंद्रपूर येथे खाजगी रुग्ण्यालयात उपचार सुरू आहे.

महात्मा गांधी शाळा गडचांदूर येथील विद्यार्थिनी गायत्री रवींद्र बोन्डे रा. कढोली खुर्द हिचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. बाखर्डी जवळ आज 18 डिसेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. नातलग मुलीच्या साक्षगंधाकरिता ती बाखर्डी येथे गेली होती. दरम्यान त्या मुलीसह ती गडचांदूरकडे बाईकने निघाली होती. दरम्यान कारने बाईकला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर साक्षगंध जिचा होता ती मुलगी आणि दुचाकी चालक गंभीर जखमी झाले.

गायत्री ही महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाची बारावीची विद्यार्थिनी होती. विविध उपक्रमात तिचा सक्रिय सहभाग असायचा. गायत्रीच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सतीश बिडकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->