कोरची : दि.19/12/2022ला बोटेकसा केंद्राची सहावी शिक्षण परिषद ता.कोरची पासुन 18 कि.मी.अतिदुर्गम क्षेत्रात जि.प.प्रा.शा.नवेझरी या गावी संपन्न झाली. शिक्षण परिषदेला अध्यक्ष मा. गंगाराम कल्लो नवेझरी हे होते. उद्घाटक ग्रा.प.नवेझरी सरपंच मा. विजय हलामी तर विशेष अतिथी म्हणुन किशोर बावणे केंद्रप्रमुख बोटेकसा, श्री.मन्साराम काटेंगा शाळा व्य.समिती अध्यक्ष तसेच श्री.मडावी मु.अ.उईके मु.अ.केरामी मु.अ. मेश्राम सर हे होते. परिषदेची सुरूवात सरस्वती माता व सावित्रीबाई फुले प्रतिमा पुजनाने करण्यात आली. नवेझरी शाळेतील मुलांनी फुलोरा परिपाठ सादर केला .
सहाव्या शिक्षण परिषदेच्या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या फुलोरा या शैक्षणिक उपक्रमाच्या व मुलभुत साक्षरता, संख्याज्ञान या निपुन भारतच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण परिषदेच्या मासिक आयोजनातुन शिक्षकांचे आपले ज्ञान अद्यावत राहण्याकरिता शिक्षकांकडुन मराठी, गणित या फुलोरा कृतीचे सादरीकरण दोन गटात प्रत्यक्ष परिषदेत घेण्यात आले. शिक्षक सहविचारने केंद्रातील विध्यार्थ्यांचा स्तर वाढविण्यासाठी विषयानुसार कृतीबाबत, बालभवनाबाबत शिक्षकांना मार्गदर्शन व विध्यार्थी, शाळा, शिक्षकांना शैक्षणीक स्तरावरील माहिती तसेच चाचण्याचा अहवाल भरण्याबाबत, ॲपची माहिती व शैक्षणिक वाटचालीत तंत्रज्ञानाचा वापर, शैक्षणिक स्तर अधिक जलदगतिने होण्यासाठी केंद्रातील मु.अ.यांनी लिंकवर मासिक कार्यालयीन माहिती भरुन बोटेकसा केंद्र पेपरलेस करण्याबाबत सुलभन श्री.किशोर बावणे केंद्रप्रमुख बोटेकसा यांनी केले.
श्री.दिपक ढबाले जिल्हा तंत्रस्नेही शालार्थ सुलभक यांनी सरल पोर्टल, संचमान्यता, शिष्यवृत्ती फार्म, आधार, युडायस बाबत सुलभन केले.
दिव्यांग बाबत सुलभन श्री.राकेश मोहुर्ले यांनी केले. केंद्रपरिषदेत दिवसभरात शैक्षणिक विषयानुसार सुलभन झाले. सुत्रसंचालन श्री.सहारे सर लेकुरबोडी यांनी केले तर आभार प्रधान सर नवेझरी यांनी मानले.
शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी सौ.तितीरमारे शिक्षिका, नाकाडे सर व केंद्रातील शिक्षकांनी सहकार्य केले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.