भीषण अपघातात युवक-युवती जागीच ठार | Batmi Express

Nagpur LIve News,Nagpur Accident,Accident,Nagpur LIve,Accident News,nagpur news,Nagpur,

Nagpur LIve News,Nagpur Accident,Accident,Nagpur LIve,Accident News,nagpur news,Nagpur,

नागपूर:- 
महाविद्यालयातून बाहेर पडत कारने फिरायला निघालेल्या इयत्ता बारावितल्या युवक आणि युवतीचा सोमवारी सकाळी अमरावती - नागपूर - अकोला महामार्गावरच्या कोंडेश्वर चौकात अपघात झाला. या अपघातात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर दोन्ही कुटुंबात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

आदित्य अखिलेश विश्वकर्मा ( 18) आणि गौरी यशवंत शेळके(17) दोघेही रा. शिवाजी नगर, अमरावती असे या अपघातात ठार झालेल्या युवक - युवतीचे नाव आहे. हे दोघेही इयत्ता बारावीचे विद्यार्थी होते आणि त्यांच्यात घट्ट मैत्री होती. सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान आदित्य एमएच 34 बीजी 1495 क्रमांकाची बेलेनो कार घेऊन आला. त्याने गौरीला सोबत घेतले. दोघेही अमरावती - नागपूर नवीन बायपास मार्गाने सुसाट निघाले. मार्गात राम मेघे कॉलेजजवळच्या कोडेंश्वर चौकात वेगात कार चालविणार्‍या आदित्यने ट्रकला ओव्हरटेक करताना थेट समोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकलाच धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार पूर्णपणे चेंदामेंदा झाली. दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

घटना लक्षात येताच आजुबाजुला असलेले धावून आले. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहचल्यावर दोघांच्याही नातेवाईकांना कळविण्यात आले. तोपर्यंत दोघांचेही मृतदेह इर्विन दवाखाण्यात आणण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.