गडचिरोली : मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीस २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. अजय अरुण हजारे, वय ३१ वर्षे, रा. आरमोरी असे आरोपीचे नाव आहे.
डिसेंबर २१, २०२२
0
आरोपी अजय याने पीडित मुलीला प्रथम नागपूर येथे नेले. तेथून तिला रेल्वेने पुणे येथील ऐवत जवळील भांडगाव येथे नेले. तिथे आम्ही भाऊ-बहीण आहोत, असे सांगून किरायाची रूम घेतली व पीडितेशी शारीरिक संबंध केले. त्यानंतर १५ दिवसांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. याबाबत मुलीने फोन करून याची माहिती वडिलांना दिली. आरमोरी पोलिस व पीडिताचे वडील भांडगाव येथे पोहोचले. आरोपीला यासंबंधी माहिती झाल्याने तो तेथून पळून गेला. त्यानंतर पुणे येथील रेल्वे स्टेशनवर फिरताना दिसला असता त्याला पकडून व पीडितेला घेऊन आरमोरी पोलिस स्टेशन येथे आले.
आरोपीला दिनांक २८ डिसेंबर २०१८ रोजी त्याला अटक करण्यात आली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून दिनांक २० डिसेंबर रोजी आरोपी अजय हजारे याला अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. मुधोळकर गडचिरोली यांनी आरोपीला २० वर्षांचा कारावास व सव्वालाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी कामकाज पाहिले. गुन्ह्याचा तपास मपोउपनि शीतल राणे यांनी केला.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.