कोरची - बेडगाव राज्यमहामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात | Batmi Express

Be
0
Korchi,Korchi Accident ,Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Accident News,Gadchiroli Batmya,Bus Accident,

  •  18 प्रवासी जखमी त्यात अडीच वर्षांचा बालक व दोन गर्भवती महिलांचा समावेश असून  4 प्रवासी गंभीर जखमी

कोरची ( तालुका - मोबाइल प्रतिनिधी ) :-  मुख्यालयापासून 4 किमी अंतरावर असलेल्या बेळगाव जवळ कोटगुल वरून येणारी खाजगी बसचे  (MH40N1014)उजव्या बाजूचा पट्टा तुटल्याने अपघात झाले असून अपघात झालेली बस ही रोडलगतच्या खड्यात जाऊन पलटली. या बसमध्ये 35 ते 40 प्रवासी प्रवास करीत असल्याचे माहिती प्राप्त झाली असून यापैकी 18 प्रवासी जखमी झाले असून 4 प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यानां पुढील उपचारा करिता गडचिरोली येथिल जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. 

        सदर अपघाताची माहिती वडसा  वरून येणारे व्यावसायिक जिशान मेमोन हे खाजगी काम करिता कोरची येथे येत असताना अपघात झाल्याचे दिसले असता यांनी अपघाताची माहिती काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल यांना दिली. तसेच वेळ वाया न घालवता मनोज अग्रवाल यांनी कोरचीतील समाज कार्यकर्ते वसीम शेख, आशिष अग्रवाल, सुरज हेमके, जितेंद्र सहारे, अभिजीत निंबेकर यांना दिली. या सर्वांनी वेळ वाया न घालवता घटनास्थळी पोहचून सर्व प्रवाशांना खाजगी वाहन तथा 108 द्वारा कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. व त्यांच्यावर योग्य ते उपचार डॉ  राहुल राऊत व त्यांच्या चमू तर्फे  करण्यात आले असून रुग्णाच्या नातेवाईकांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले. गंभीर जखमी रुग्णांना गडचिरोली येथे हलविण्यात आले.  

      सदर अपघातात रामचंद्र टेंभुळकर (वय 75वर्ष ) बेडगाव , जयाबाई धुर्वे कुरखेडा(वय 70वर्ष ),संताबाई मडावी कोरची  (वय 35वर्ष ),श्यामलाल पुरमे सोनपूर(वय 65वर्ष ),कुमारी गावडे नांदळी (वय 30वर्ष ),ललिता पडोटी सोनपूर(वय 40वर्ष ), अंबरीबाई टेंभुर्णे (वय 36वर्ष ), निकिता  टेंभुर्णे बोरी (वय 21वर्ष ), दीपिका शिकारी कोटगुल (वय 25वर्ष ),, रामलाल शिकारी कोटगुल (वय 40वर्ष ), अरमान शिकारी कोटगुल (वय अडीच वर्ष ),रचना शिकारी कोटगुल (वय 7वर्ष ),नंदिनी शिकारी कोटगुल (वय 3वर्ष ), आनंदराव मरापे कोरची(वय 56वर्ष ),हिलम  मडावी मोहगाव (वय 21वर्ष ), मनोज मडावी मोह्गाव (वय 25वर्ष ), असे एकूण 18 प्रवासी गंभीर जखमी झाली असून यापैकी दीपिका शिकारी, आनंद मरापे ,अमरी बाई टेंभुर्णे, , निकिता  टेंभुर्णे यांना पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघातात दोन गर्भवती महिला व अडीच वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. 

      अपघातग्रस्तांना मदतीसाठी धावून आलेले मनोज अग्रवाल, वसीम शेख, आशिष अग्रवाल, सुरज हेमके ,जितू सहारे, अभिजीत निंबेकर या सर्वांचे रुग्णालयांच्या नातेवाईकाने आभार मानले असून, ते आमच्यासाठी देवदूत ठरले अशी प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली. 

   अपघाताची पुढील तपास बेळगावचे पोलीस उपनिरीक्षक अनिल नानेकर करीत असून बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती प्राप्त झालेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->