कोरची(कोचीनारा) - ( तालुका - मोबाइल प्रतिनिधी ) :- आज दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोज बुधवार ला कोचिनारा या गावातील जंगल परिसरात असलेली ,"शितला माता मंदिर"देवस्थान या ठिकाणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोचिनारा या शाळेतील संपूर्ण शाळेचे सर्व विद्यार्थी / शिक्षक क्षेत्रभेट व वनभोजनाचा हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमाची सुरुवात श्री किशोर कराडे अध्यक्ष व सौ.रत्नामाला सहारे उपाध्यक्ष व कुं. मंदा महादेव आवारी मॕडम मुख्याध्यापिका (उच्च श्रेणी)(तथा प्रभारी केंद्रप्रमूख बेडगाव ) शा.व्य.समिती कोचिनारा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
कार्यक्रमा स्थळी वातावरण निर्मिती म्हणून फुलोरा क्षमता विकसन कार्यक्रमा अंतर्गत "रोज चांगली बुध्दी दे" कृतियुक्त गीत गायन करुन उपक्रमाला सर्व प्रथम श्री हिरासिंह आर. बोगा सर यांनी "निसर्ग निरीक्षण"यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थी या कृतीचा उत्साह दाखवून शितला माता मंदिरा जवळील निसर्ग निरीक्षण करुन विविध झाडांचे ,जवळच असलेले तलावांचे ,पक्ष्यांचे, तलावातील कमळ फुले, शेत यावर माहिती सांगून त्यावर विचारलेले प्रश्नांची उत्तरे सांगितले . यानंतर श्री लोकचंद जमदाळ सर व विषय शिक्षक श्री चंदरशहा मडावी सर यांनी विद्यार्थ्यांचे चार गट तयार करुन "प्रश्नमंजुषा" हि स्पर्धा "कमळ गट, निसर्ग गट, तलाव गट व मंदिर गट "या गटामध्ये घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत भाग घेतला. यामध्ये तलाव गटाने पहिल्या नंबरने बाजी मारली तर निसर्ग गटाने दुसरा क्रमांक पटकावला. यानंतर श्री वसंत भैसारे सर यानी म्युझिक द्वारे गाण्याचे व शब्दांचे भेंडयांचे खेळ हा उपक्रम घेतला. सर्वच विद्यार्थ्यांनी या खेळा मध्ये सहभाग नोंदविला.
त्यानंतर वनभोजनाला सुरुवात करण्यात आली. या भोजनात चिकन व फुलकोबी, आलु भाजी व वनभोजनाला गोडपणा यावा म्हणून जिलेबी देण्यात आली.
वरिल वनभोजनात सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ,पालक, माता पालक सद्स्य, शिक्षक वृंद, गावातील प्रतिष्ठीत नागरिक तसेच या कार्यक्रमात वेळेवर का होईना श्री कैलाश नुरुटी सर मु.अ.टेमली आदी उपस्थित होते.
यानंतर शेवटी "वंदे मातरम् " या गिताने सांगता करण्यात आली. या उपक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री मनोहर परशुरामकर , प्रकाश चिलबुले ,चंदरशहा मडावी , वसंत भैसारे , हिरासिंह बोगा , लोकचंद जमदाळ सर आणि विशेष सहकार्य म्हणजे आमच्या शाळेचे स्वयंपाकी बाया सौ.प्रभाबाई सहारे, सौ.पुष्पाबाई देवांगण व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.