तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

वाघ पुन्हा आला...वाघाच्या हल्यात इसम ठार | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Tiger Attack,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Tiger Attack,Gadchiroli Batmya,

गडचिरोली, 3 नोव्हेंबर :
जिल्ह्यात वाघाचे इसमावरील हल्ले थांबता थांबेना, तालुक्यातील राजगाटा चक शेतशिवारत स्वतःचे बैल राखत असतांना वाघाने हल्ला करून इसमास ठार केल्याची घटना आज 3 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. सुधाकर उरकुडा भोयर (55) राजगाटा चक असे मृतक इसमाचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार, सुधाकर भोयर हे आपल्या शेतशिवारत बैल राखत होते. दरम्यान वाघाने त्यांच्यावर झडप घेऊन नरडीचा घोट घेत ठार केले. यांच्या मृत्यूने भोयर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या परिसरातील ही तिसरी घटना असल्याचे बोलल्या जात आहे. या परिसरात नरभक्षी वाघाने धुमाकूळ माजवत आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. वाघास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक वारंवार करीत आहे मात्र वनविभाग यात अपयशी ठरत आहे. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.