Education: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता शाळेत 75 टक्के उपस्थिती असणार बंधनकारक | Batmi Express

Education News,Education,Amaravati,Nagpur,Pune,Maharashtra,Mumbai,SSC 2022,SSC 2022 News,HSC 2022 News,

Education News,Education,Amaravati,Nagpur,Pune,Maharashtra,Mumbai,SSC 2022,SSC 2022 News,HSC 2022 News,

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तुम्हाला माहिती असेल, आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी हा नियम बंधनकारक नव्हता. मात्र, मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती बंधनकारक असणार आहे, असे शिक्षण मंडळाने सांगितले.

आणखी काय सांगितले शिक्षण मंडळाने ?

शाळेत किमान 75 टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देता येणार नाही. किमान 75 टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनाच परीक्षेची प्रवेशपत्रे दिली जातील. असे आदेश सर्व शाळा-महाविद्यालयांना शिक्षण विभागाने दिले आहेतप्राचार्य, मुख्याध्यापकांना सूचना - शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करावी. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीबाबत शिक्षक, विद्यार्थी, पालकांना ही बाब निदर्शनास आणून द्यावी, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.