गडचिरोली: अबब... भाऊ मोहाची दारू पाहिजे का... चला मग मोहटोला... दारूमुळे अनेक संसार उघड्यावर | Batmi Express

Be
0

Armori,Armori Live,Armori News,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,

आरमोरी
:- आरमोरी तालुक्यातील मोहटोला येथे मोठ्या प्रमाणात मोहफुलाच्या दारूची विक्री होत असल्याने दिवसागणिक मोहटोला येथे सभोवतालच्या परिसरातील तळीरामांची नेहमीच गर्दी बघायला मिळत असते. शिवाय मोहटोला गावाला बार चे स्वरुप प्राप्त होत असते. असे गावकऱ्याचे म्हणने आहे.

दारूमुळे मोहटोला येथील दारुविक्रेते मालामाल होत आहेत याउलट तळीरामां सारख्या अनेकांच्या आयुष्याची वाताहात होतांना दीसुन येत आहे. कित्येकांचे संसार उघड्यावर पडल्याची विचीत्र परीस्थीती निर्माण होत आहे. परंतु दारू पिणाऱ्यांची संख्या कमी होतांना दिसत नाही काही वेळा बऱ्याचश्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला दारू पिऊन पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्यामुळे जीवित हानी ही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर पोलीस प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन दारु विकेत्यावर कारवाई करणार का ॽ अस प्रश्न समस्त गावकरी मंडळींना पडलेला आहे.

गडचिरोली जिल्हा दारुबंदी म्हणून प्रचलीत असतांना दारुचा अवैध धंदा चालतोच कसा ॽ असा यक्षप्रश्न उपस्थित होतो आहे. पोलीस प्रशासन तथा मुक्तीपथाच्या कारवाया थंडावल्या की कायॽ असे एक नव्हे तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मोहटोला येथील दारूचा अड्डा चालतो यास आशीर्वाद कुणाचा ॽ असाही प्रश्न निर्माण होऊन तशी चर्चा जनमानसात बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे दारू पिणाऱ्यांना या ठिकाणी 24 तास दारू मिळते परंतु जेव्हा पोलीस विभाग छापा मारते त्यावेळेस दारू पोलिसांना का बरं सापडत नाही ? हा एक संशोधनाचा विषय आहेत्यामुळे या दारू विक्रेत्यासोबत पोलिसांचे सेटेलोटे ठेऊन हा मोबाइलचा कमाल तर नाही ना ? अशी शंका नागरिकांमध्ये निर्माण होत आहे .दारू पिणाऱ्यामुळे गावातील सामाजिक सलोखा बिघडत असून ठिकठिकाणी दारू पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे व रस्त्याच्या कडेला बरेचसे दारू पिणारे पडून बेहाल अवस्थेत पडुन असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे वरील गंभीर बाबींची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने दारुविक्रेते विरोधात दारुबंदी कायद्याअंतर्गत कड्क तसेच धडक व योग्य ती कारवाई करून बंदोबस्त करावा. व मोहटोला वासीयांची समस्या निकाली काढली जावी अशी मागणी परिसरातील महिला व नागरिकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->