आईसह 4 जणांचा तलावात बुडून मृत्यू | Batmi Express

Sangli,Sangli News,Drowned,

Sangli,Sangli News,Drowned,

सांगली
- जिल्ह्यातील जत तालुक्यात आईसह 4 जणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.जत तालुक्यातील बिळूर गावातील सुनीता माळी यांच्या घराजवळ तलाव असून त्या कपडे धुण्यासाठी तिथे गेल्या होत्या त्यावेळी त्यांच्या सोबत मुलीही होत्या, कपडे धुत असताना त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला असावा अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

तीन लेकींसह आईचाही तलावात बुडून मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. तलावातील सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
मृतकांमध्ये 30 वर्षीय सुनीता माळी, 13 वर्षीय अमृता माळी, 10 वर्षीय अश्विनी माळी व 7 वर्षीय ऐश्वर्या माळी यांचा समावेश आहे.

संपूर्ण माळी कुटुंबीयांना या घटनेनं मोठा धक्का बसलाय. अख्खं बिळूर गाव या घटनेनं हादरुन गेलंय. तलावात चारही जण पडल्या कशा, त्याच्या बुडून मृत्यू होण्यामागचं नेमकं कारण काय? याचं गूढही वाढलंय. हा अपघात होता की घातपात, या संशयावरुन अनेक सवालही उपस्थित केले जात आहेत

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.