'
30 seconds remaining
Skip Ad >

चिमूर: राष्ट्रीय महामार्गावर अपघातात वनरक्षकाचा मृत्यू | Batmi Express

0

Chimur,Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,Chandrapur News,Chandrapur Live,

चिमूर
:- चिमूर तालुक्यातील वनपरिक्षेत्र खडसंगी (बफर) अंतर्गत येणाऱ्या वनक्षेत्र बोथली (वहानगाव) येथे कार्यरत असणारे वनरक्षकांचा रविवारी (दि.९) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कर्तव्यावरून दुचाकीने परत येत असताना अपघात झाला.

ही घटना चिमूर – वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील वहानगाव येते झाला असून यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सुरेश केंद्रे ( वय ३४) असे त्‍यांचे नाव आहे.
वनरक्षक सुरेश केंद्रे हे वनक्षेत्र बोथली (वहानगाव) बिटात रात्री गस्त घालण्यासाठी गेले होते. दरम्यान कर्तव्यावरुन घरी खडसंगीकडे परत येत असताना वरोरा-चिमूर राष्ट्रीय महामार्गावरील वहानगावजवळ झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या मार्गानी प्रवास करणाऱ्या नागरिकांनी घटनेची महिती वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांना दिली.
किरण धानकुटे तातडीने वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघाताची माहिती शेगाव पोलीस स्टेशनला दिली. शेगाव पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदनसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. यानंतर सुरेश केंद्रे यांचा मृतदेह त्यांच्या मूळगावी नांदेड येथे रवाना करण्यात आला आहे.
हा अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेने की वन्य प्राण्याच्या धडकेने झाला आहे हे अद्याप स्पस्ट झालेले नाही. तपास शेगाव (बु.) पोलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोरते करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×