महात्मा फुले चौकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची
:- अख्ख्या विश्वाला मानवतेचा संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी, खंजिरीचे निर्माते व ग्रामगीतेचे रचनाकार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 54 वि  पुण्यतीथी निमित्त्याने यांच्या पावन स्मूर्तीस विनम्र अभिवादन करण्यास दिनांक 11/10/2022 ला सायंकाळी 6:00 वा सर्व  कोरची नगरातील, महात्मा फुले चौकातील समाज बांधव एकत्र येऊन पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.  तत्पूर्वी माळी समाजातील समाज बांधवांनी श्रमदानाच्या माध्यमातून वार्ड क्रमांक 16 मध्ये ग्रामसफाईचा उपक्रम  राबविला.

 सायंकाळी तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला दीप प्रज्वलित व हार अर्पण करून पुण्यस्थिती साजरी करण्यात आली. सोबतच समाज प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मार्गदर्शन राकेश मोहुर्ले सर यांनी केले.यावेळी त्यांनी जाती-धर्म रूढी परंपरा, भेदभाव, अंधश्रद्धा, व समाज संघटन याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. सुधाकर हिडामी यांनी आपल्या मार्गदर्शनात ग्रामगीता महत्त्व , समाज सेवा व राष्ट्रनिर्माण याविषयी मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन संतोष मोहुर्ले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केशवजी मोहुर्ले, शामराव वाढई, विनोद गुरनुले अरुण गुरनुले, श्रीहरी मोहुर्ले, अरुण मोहुर्ले त्याचप्रमाणे माळी युवक मंडळ व युवती मंडळ तसेच सर्व माळी समाज बांधवांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.