'

कोरची येथील नंदनवन कॉलनी येथे कोजागिरी पौर्णिमा साजरी | Batmi Express

0

 

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची :- येथील वार्ड क्रमांक 2  मधील नंदनवन कॉलनी ही भारतीय संस्कृती जपणारी कॉलनी म्हणून ओळखली जात असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा नंदनवन कॉलनी मध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून नंदनवन कॉलनीतील महिला पुरुष व बाल गोपाल यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत व सांस्कृतिक कार्यक्रमात सर्वांनी एकत्रित येऊन भाग घेतले व सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन आनंदाने व खेळीमेळीचे वातावरण निर्माण करून कोजागिरी पोर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये  मध्ये सहभागी झाले. 

महिलांनी सुद्धा आनंदाने विविध पंचपक्वान तयार केले. तसेच या दिवशी दुधाचे महत्त्व विशेष असून सर्व महिला पुरुष वर्ग मिळून दुधाची बासुंदी बनविण्यास रस दाखविले. सदर कोजागिरी पौर्णिमा सर्वांसाठी एक आनंद देणारा सण होता असे वाटू लागले होते. आणि सर्वांनी यासाठी सहकार्य केले. 

 सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण नंदनवन कॉलनी येथील सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×