कोरची :- राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प सण 2022-23 अंतर्गत तालूका स्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत स्पर्धेचे आयोजन गट साधन केंद्र कोरची येथे 10 ऑक्टोबर ला घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत टेंभुर्ण गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरची, प्रमुख अतिथी श्री, हिराजी रामटेके सर गटसमन्वयक हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
सदर स्पर्धेत एकूण 4 शाळा सहभागी झाले. त्यात जिल्हा परिषद हाइस्कूल बेडगाव, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोचीनारा,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांभळी, आश्रम शाळा कोरची या शाळा सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचे परीक्षण नामदेव नागपुरे बोटेकसा, सुरज हेमके कोरची, होमराज बिसेन बेतकाठी यांनी मूल्यांकन केले. कार्यक्रमाचे संचालन श्री पी.डी. वाढणकर विषय साधन व्यक्ती, आभार प्रदर्शन श्री राकेश मोहूर्ले संसाधन शिक्षक यांनी मानले.
स्पर्धेत लोकनृत स्पर्धेत प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा जांभळी व दुसरा क्रमांक जिल्हा परिषद शाळा कोचीनारा यांनी पटकावला. भूमिका अभिनय स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा बेडगावने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. उपस्थित शिक्षक ,शालेय विद्यार्थांनी अतिशय उत्साहात व आनंदात स्पर्धेत सहभागी होऊन सहकार्य केले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.