तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण व्हावी : शाखा व्यवस्थापक सतीश कावरे | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,


  • ११७ व्या बँक ऑफ इंडिया वर्धापनदिन निमित्त टाहकाटोला विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तूचे वितरण

कोरची: दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण व्हावी. विद्यार्थी आपले भविष्य उज्वल बनवुन विकास साधावा या हेतूने कोरची बँक ऑफ इंडिया शाखेच्या ११७ व्या वर्धापनदिनानिमित्त टाहकाटोला येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय भेट वस्तूंचे वितरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी शाखा व्यवस्थापक सतीश कावरे बोलत होते. पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाहकाटोला येथे बँक ऑफ इंडिया शाखेचे ११७ वर्ष पूर्ण झाल्याने १७ सप्टेंबर शनिवारला बँक ऑफ इंडिया शाखा कोरची च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तू वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोरची बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक सतीश कावरे, प्रमुख अतिथी अतिरिक्त शाखा व्यवस्थापक नंदकिशोर नाकाडे, शाळा समिती सदस्य दर्याव मडावी, तुळशीराम मडावी, फत्तेसाय नैताम, बी सी कर्मचारी सलीमखान पठाण, रंजीत सरजारे, विशाल सहारे, अविनाश अंबादे उपस्थित होते.

टाहकाटोला जिल्हा परिषद शाळेतील १६ विद्यार्थ्यांना व अंगणवाडी केंद्र येथील १२ विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेचे दप्तर, टिफिन बॉक्स व शालेय साहित्य भेट वस्तूचे वाटप केले साहित्य मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद बघायला मिळाला. शाळेचे मुख्याध्यापक गौरव गावळे यांनी अशा प्रकारच्या बँकेच्या उपक्रमांची स्तुती केली या उपक्रमातून विद्यार्थ्यांची शालेय विषयी आवड निर्माण होऊन शालेय उपस्थितीत व शालेय गुणवत्ता वाढण्यास मदत होईल असे मत व्यक्त करत बँक ऑफ इंडीया शाखेचे कर्मचाऱ्यांचे स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक गौरव कावळे तर आभार शाळा समिती सदस्य तुळशीराम मडावी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.