राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोरची तालुक्यात 18 सप्टेंबरला परिवार संवाद यात्रेचे आयोजन | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,
Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,


  • तालुक्यातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उपस्थित राहण्याचे तालुका अध्यक्ष सियाराम हलामी यांचे आवाहन

कोरची: तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, दुर्बल घटकातील व्यापारी यांच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करून निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत तालुक्यातील ज्वलंत समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक अध्यक्ष सियाराम हलामी यांनी केले आहे.

तालुक्यातील कोटगुल येथे सकाळी 10 वाजता, गाहाणेगाटा 12 वाजता, कोटरा 2 वाजता, बेडगाव येथे सायंकाळी 4 वाजता परिवार संवाद यात्रेचे आगमन होणार असल्याने परिसरातील नागरिकांना आप आपल्या गावातील भागातील समस्याचे निवेदन घेऊन वरिष्ठांना देवून समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार धर्मामारावबाबा आत्राम, जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर,  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानाभाऊ नाकाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, युनूस शेख प्रदेश संघटक सचिव, विठ्ठल निखुले, इंद्रपाल गेडाम, अमर खंडारे, आरिफ पटेल, लीलाधर भरडकर  युवक जिल्हा अध्यक्ष, शाहीन हकीम महिला जिल्हा अध्यक्ष , विजय गोरडवार, योगेश नांदगाये उपस्थित राहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.